Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: महाजनांचे खडसेंना सणसणीत उत्तर, ‘खडसेंचा हावरटपणा सगळ्यांनी पाहिलाय’

Girish Mahajan; BJP leader Mahajan criticize Eknath khadse-नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खडाखडी

Sampat Devgire

Girish Mahajan News: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. यासंदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महाजन यांची खिल्ली उडवली होती.

नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजन हे हावरटासारखे वागत आहेत. नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनाही अस्वस्थ वाटत असावे, असा टोमणा माजी मंत्री खडसे यांनी मारला होता.

त्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तेवढेच सणसणीत उत्तर दिले आहे. ते म्हणाले, हावरटपणा कशाला म्हणतात? हे एकनाथ खडसे यांनी सांगू नये. पुण्याच्या खटल्यात आणि महसूल रॉयल्टी प्रकरणात त्यांचा हावरटपणा सगळ्यांनी पाहिला आहे. त्यासाठी त्यांना जेलवाऱ्याही करावे लागले आहेत.

श्री. खडसे यांनी भाजपला किंवा मला सल्ले देण्याचे काम करू नये, असे ते म्हणाले. नाशिकच्या कुंभमेळ्याचा मला अनुभव आहे. यापूर्वीचा कुंभमेळा मी यशस्वीपणे पार पाडला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा मी पालकमंत्री व्हावे, असा आग्रह आहे. त्यामुळेच मला मुख्यमंत्र्यांनी ती जबाबदारी दिली आहे.

माजी मंत्री खडसे यांनी आमच्यावर हावरटपणा करीत असल्याची टीका करणे हे अनकलनीय आहे. सबंध जनतेने खडसे यांचा हावरटपणा पाहिला आहे. या हावरटपणामुळे त्यांची काय अवस्था झाली आहे, हे सगळ्यांना माहित आहे.

आज श्री खडसे कुठे गेले आहेत आणि काय करत आहेत, हे जनता पहात आहे. त्यांच्यावर दारोदार भटकण्याची वेळ का आली? प्रत्येक राजकीय पक्षाचे दार ठोठावण्याचे काम त्यांनी केले आहे. मात्र त्यांच्या हावरटपणाला कोणीही प्रतिसाद देत नाही.

माजी मंत्री खडसे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का? यावर देखील जलसंपदा मंत्री महाजन यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील, हे मी सांगू शकत नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. खडसे यांचे मोठ्या नेत्यांची संबंध आहेत. दिल्लीत आणि मुंबईत यांचे संपर्क होत असतात. त्यामुळे या विषयावर मी काहीही भाष्य करणार नाही.

एकंदरच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खडसे आणि महाजन यांच्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप थांबले होते. आता त्यांना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. माजी मंत्री खडसे यांनी जलसंपदा मंत्री महादेव यांना दिवसल्याने महाजन यांनीही त्यांना तेवढ्याच पेशाने उत्तर दिले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT