Sujay Vikhe : थोरातांच्या घराशेजारील मैदानावर सुजय विखेंचा 'मैं हूँ डॉन' गाण्यावर डान्स...

BJP Sujay Vikhe song Main Hoon Don Congress Balasaheb Thorat Sangamner : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या घराशेजारील मैदानावर कार्यक्रम घेतला.
Sujay Vikhe 2
Sujay Vikhe 2Sarkarnam
Published on
Updated on

Ahilyanagar News : विखे अन् थोरात यांच्यातील राजकीय वैर वेगळ्याच पातळीवर पोचलं आहे. विखे हे थोरात यांना डिवचण्याची कोणतीही संधी सोडत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हा राजकीय संघर्ष अधिकच वाढला आहे.

आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घराशेजारील मैदानावर 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर डान्स केला. सुजय विखे यांचा यांचे हे टायमिंग अन् डान्स करण्यासाठी निवडलेल्या गाण्यावरून संगमनेरमध्ये चर्चा रंगली आहे.

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थाना शेजारीच जाणता राजा मैदान आहे. या मैदानावरील एका कार्यक्रमानिमित्ताने सुजय विखे आणि आमदार अमो खताळ एकत्र आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक रॅम्प वॉक केला.

Sujay Vikhe 2
BJP Politics : 'आप' उद्धवस्त होताच, अण्णांचं होतय कौतुक; मोदींपाठोपाठ भाजपच्या 'या' नेत्यानं 'आप'वर डागली तोफ

भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांनी 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर ठेका धरला. विखे यांचा हा ठेका जणू काही थोरातांना खिजवण्याचा प्रयत्नच होता. बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्यासाठी सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघात अनेक सभा घेत, अमोल खताळ यांना ताकद दिली होती.

Sujay Vikhe 2
Devendra Fadnavis : ठाकरे आता भाजपला नकोच; देवेंद्र फडणवीसांची खमकी भूमिका

विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात शिवसेनेचे अमोल खताळ यांना ताकद देताना, विखे आणि थोरात यांचा संघर्ष उफाळला होता. संगमनेरमध्ये दंगल झाली होती. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का बसला होता.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुजय विखेंना यांना पराभवाला समोरं जावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांना निवडून आणण्यात बाळासाहेब थोरात यांनी किंगमेकरची भूमिका निभावली होती.

'स्थानिक'च्या निवडणुकीत वाद उफळणार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर विखे अन् थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला आहे. पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांचे मतदारसंघात तळ ठोकून आहे. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांवर, गाठी-भेटीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसंच आमदार अमोल खताळ यांनी सत्तेचा वापर करून घेत, मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आमदार खताळ यांना विखेंचं राजकीय बळ मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील हा राजकीय संघर्ष उफाळू शकतो, असे जाणकरांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com