Girish-Mahajan, Devyani Pharande & Rahul Dhikle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजनांकडून सारवासारव, आता म्हणतात.. आमदार ढिकले व फरांदे दोघांनाही सारखाच अधिकार

MLA Rahul Dhikle, Devyani Farande : निवडणूक प्रमुख पदावरुन भाजपने आमदार ढिकलेंना हटवून आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केली होती. पण आता भाजपकडून मतभेद समोर येऊ नये म्हणून सारवासारव करण्यात आली.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांना जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी एका कार्यक्रमात विधानसभेला पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या व त्यांना त्रास देणाऱ्यांना आस्मान दाखवण्याचे वक्तव्य केलं होतं. यामुळे पक्षाने त्यांच्याकडून निवडणूकप्रमुख पद काढून घेत नाशिक मध्य'च्या आमदार देवयानी फरांदे यांना जबाबदारी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी दि. १७ डिसेंबर रोजी अधिकृत पत्रक काढत नाशिक महापालिका निवडणुकीकरीता आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ढिकले यांना पक्षाने आस्मान दाखवत फरांदे यांना निवडणूक प्रमुख केलं. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील मतभेद समोर आल्याने त्यावर आता पांघरुन घालण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.

शहराध्यक्ष म्हणतात दोघांवर जबाबदारी

नाशिक महानगर पालिका निवडणूक व्यवस्थेचा भाग म्हणून आणखी एक संघटनात्मक पद तयार करण्यात आले आहे. आता आ. ॲड.राहुल ढिकले व आ.देवयानी फरांदे या दोघांवर नाशिक महानगर पालिका निवडणुक जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत वर्तमान पत्रे व टी व्ही चॅनल वर आलेल्या उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नाही. असे स्पष्टीकरण भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी दिले आहे.

महाजन म्हणतात दोघांना सारखेच अधिकार

तसेच मंत्री गिरीश महाजन यांनीही यावर सारवारव करण्याचा प्रयत्न केला. जितका अधिकार आमदार देवयानी फरांदे यांना आहे, तितकाच अधिकार आमदार राहुल ढिकले यांनाही असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. तसेच शहरातील तीन्ही आमदारांना विश्वासात घेऊनच उमेदवारीचा निर्णय घेऊ असे महाजन म्हणाले.

परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या नियुक्तीच्या काढलेल्या पत्रकातच ढिकले व फरांदे दोघांकडेही जबाबदारी देण्यात आली आहे असा उल्लेख का केला नाही? दोघेही काम पाहणार आहेत असे का स्पष्ट करण्यात आले नाही. दोघांवर नेमक्या काय व कोणकोणत्या जबाबदाऱ्या असणार हे का नमूद केलं गेलं नाही. असा प्रश्न या निमित्ताने राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

ढिकले यांनी काय वक्तव्य केलं होतं?

एका भाषणात ढिकले म्हणाले, की माझ्या विरोधात पक्षातीलच मंडळीने काम केले, माझी रॅली आडवली. मला त्रास दिला. त्यांना मी आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण आता निवडणूक प्रमुख मी आहे. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यांच्या या वक्तव्यानंतरच पक्षाने आमदार फरांदे यांची निवडणूक प्रमुख पदी निवड केल्याचे पत्रही तेवढ्याच तीव्रतीने काढलं. त्यातून पक्षातील दोन गट स्पष्ट दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT