Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan On Ceasefire : 'आव्हाड, राऊतांना काही कामच राहिले नाही म्हणून युद्धविरामावर टीका', गिरीश महाजन यांनी सुनावले

Girish Mahajan Criticizes Jitendra Awhad Sanjay Raut :अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शस्त्रसंधी जाहीर केली. त्यामुळे बाहेरच्या देशातील नेते युद्धावर निर्णय व भाष्य कसे करू शकतात, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Sampat Devgire

Girish Mahajan Politics : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या टिकेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना कोणतेही काम नाही, असा टोला त्यांनी लगावला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शस्त्रसंधी जाहीर केली. त्यामुळे बाहेरच्या देशातील नेते युद्धावर निर्णय व भाष्य कसे करू शकतात अशी टीका खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावर या नेत्यांच्या टीकेला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, गिरीश महाजन यांनी म्हटले.

संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना सध्या कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही. त्या दोघांचेही पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून प्रभावहीन होत चालले आहेत. त्यामुळे त्यांना काहीतरी टीका करावी लागते. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. त्यांना चांगला धडा शिकवला आहे. परंतु युद्धविराम झाला असला तरीही विरोधक टीका करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी मागितला आहे. या मागणीची ही महाजन यांनी खिल्ली उडवली. अशी मागणी करणे हास्यास्पद आहे. आपल्या देशाचे सक्षम सैन्य आहे. त्यामुळे बाहेरच्यांची सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही, असे त्यांनी म्हटले

काँग्रेस, मनसेवर निशाणा

काँग्रेसने दहशतवादाबाबत केंद्र सरकारला प्रश्न केला होता. सध्याचा प्रश्न दहशतवादाचा नसून पाकिस्तानकडून सुरू असलेली आगळीक आणि भारत विरोधी कारवाया हा आहे. त्याला आपल्या देशातील सरकारने चांगले उत्तर दिले आहे. हा दहशतवादाचा विषय वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे जलसंपदा मंत्री म्हणाले.

राज ठाकरे यांनी युद्ध करण्याची आवश्यकता होती का? प्रश्न केला होता. यासंदर्भात प्राप्त परिस्थिती आणि दोन्ही देशांच्या सीमेवर काय कारवाया सुरू आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भारतीय सैन्याला पाकिस्तानला उत्तर देणे क्रमप्राप्त होते. त्या दृष्टीने आपण प्रभावी आणि पाकिस्तानला जर बसेल असे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT