Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics : गिरीश महाजनांचे वेगळेच संकेत, जळगावची सगळी समीकरणं बदलणार..

Jalgaon BJP news : जळगाव शहरात मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केलं.

Ganesh Sonawane

Girish Mahajan Politics : राज्यात सध्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांचे अर्थात महायुतीचे सरकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजप काहीसा वेगळा विचार करु शकतं असे संकेत भाजपचे संकटमोचक समजले जाणारे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात नुकतीच गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यशाळा झाली. या कार्यक्रमात अन्य पक्षातील अनेक स्थानिक नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याचे आवाहन मंत्री महाजन यांनी पदाधिकारी व कार्यकत्यांना केलं.

जळगावात पार पडलेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व कारकर्त्यांशी मंत्री महाजन यांनी संवाद साधला. आगामी काळातील पक्षाचे धोरण, केंद्र व राज्य सरकारची कामगिरी व मतदारसंघातील विकास कामे लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन महाजन यांनी केले. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चोधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आदी उपस्थित होते.

यावेळी महाजन यांनी जिल्हापरिषदेसह पंचायत समित्या महापालिका आणि नगरपालिकांवर भाजपची एकहाती सत्ता मिळवण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा अशा सूचना सर्वांना दिल्या. त्यांच्या या आवाहनातूनच आगामी निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुका लढविण्याचे अप्रत्यक्ष संकेत मिळल्याची चर्चा असून आता जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मंत्री महाजन म्हणाले की, जिल्ह्यात कायमच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. गेल्यावेळेला महापालिकेत आपण जे यशं मिळवलं ते याही वेळेला कायम ठेऊ. जळगाव महापालिकेत कुणाचेही नगरसेवक नसतील, तेवढे भाजपचे असतील. राज्यात कोणत्या पक्षाकडे नसतील तेवढ्या नगरपालिका जिल्ह्यात भाजपकडे असतील. हाच कित्ता जिल्हा परिषदेतही गिरवायचा असल्याचा मंत्र महाजन यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. गेल्या वेळी जळगाव पालिकेत 57 नगरसेवक निवडून आले होते, यावेळी बहुमताचा आकडा वाढवायचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT