Demand for arrest of Girish Mahajan's impersonator nephew Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics : महाजनांनी तब्बल 10 वर्षं ताणून धरलं.. पण शेवटी मैदान मारलंच! विरोधकांना नामोहरम करून घेतली संस्था ताब्यात

Jamner Education Institute : जामनेर शिक्षण संस्थेत गेल्या १० वर्षांपासून या संस्थेत दोन समांतर संचालक मंडळ कार्यरत होते. धर्मादाय आयुक्त व खंडपीठात वाद पोहोचला होता. मात्र तो वाद आता मिटला आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : जामनेर शिक्षण संस्था ही जळगाव जिल्ह्यातील एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. स्वर्गीय माजी आमदार आबाजी पाटील हे या शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. कालांतराने मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांची या संस्थेत एण्ट्री झाली. त्यातून वर्चस्ववादाच्या उद्देशाने संचालकमंडळात दुफळी निर्माण झाली.

गेल्या १० वर्षांपासून या संस्थेत दोन समांतर संचालक मंडळ कार्यरत होते. सहायक धर्मादाय आयुक्त व खंडपीठात संस्थेचा वाद प्रलंबित होता. संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल हे सुरेश दादा जैन यांचे समर्थक आहेत. त्यांच्या व गिरीश महाजन यांच्या गटात संस्थेवर वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने वाद निर्माण झाले.

गिरीश महाजन व सुरेश धारिवाल या दोघांच्या गटाने संस्थेवर दावा केला. त्यातून दोन समांतर संचालक मंडळ कार्यरत होतं. धर्मादाय आयुक्त व खंडपीठात वाद गेल्याने संस्थेचे लोकप्रियता देखील खराब झाली. एकाच संस्थेचे दोन अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ असल्याने संस्थेचा शैक्षणिक विकासही थांबला होता.

मात्र, तब्बल १० वर्षांपासून सुरु असलेला वाद आता मिटला असून संस्थेचे सचिव सुरेश धारीवाल यांनी दाखल केलेल्या याचिका मागे घेत संस्थेचा कारभार मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाकडे सोपवला आहे.

सुरेश धारिवाल यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नातलग असलेल्या जितेंद्र पाटील यांच्याकडे संस्थेची कागदपत्रे व कपाटाच्या चाव्या सोपवल्या. जामनेर शिक्षण संस्थेची आर्थिक उलाढाल मोठी आहे. संस्थेचे नाव मोठे आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांना ही संस्था आपल्या समर्थकांच्या ताब्यात ठेवायची होती असे सांगितले जाते.

त्यातूनच महाजन यांनी तब्बल १० वर्ष हे प्रकरण ताणून धरलं. विरोधकांना नामोहरम करून अखेर मंत्री महाजन यांना संस्था ताब्यात घेण्यात यश आलं आहे. जितेंद्र पाटील हे मंत्री महाजन यांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहातात ते महाजन यांचे विश्वासू असल्यानेच पाटील यांच्याकडे या संस्थेची धुरा सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Jalgaon Politics)

दरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जामनेर शिक्षण संस्थेचा विकास होईल असा विश्वास असल्याने खंडपीठातील सर्व याचिका मागे घेतल्या. कोणत्याही अटीशर्थी न ठेवता संस्थेचा कारभार महाजन यांच्या गटाकडे सोपवत आहे. अशी प्रतिक्रिया सुरेश धारीवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT