Chhagan Bhujbal : अखेर भुजबळांनी भाजपला दिलेला शब्द पाळला, येवल्यात मोठ्या राजकीय घडामोडी..

Chhagan Bhujbal BJP promise : येवला हा राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप अशी युती झाली होती. त्यावेळी भुजबळांनी भाजपला एक शब्द दिला होता जो त्यांनी पाळला आहे.
Devendra fadnavis, chhagan bhujbal
Devendra fadnavis, chhagan bhujbal .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : येवला हा राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीत भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. भुजबळांवर ह्रदय शस्रक्रिया झाल्याने ते मुंबईत उपचार घेत होते. त्यामुळे माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला नगरपालिका निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. समीर भुजबळांनी आपले नेतृत्व सिद्ध करत अखेर येवल्याचा गड राखला.

येवला नगरापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर शिवसेनेचे आव्हान होते. अशात राष्ट्रवादी व शिवसेना दोन्ही पक्षांची युतीकरण्यासंदर्भात भाजपसोबत चर्चा सुरु होती. राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु असताना भाजप नगराध्यक्षपदासाठी आग्रही होते. पण भुजबळांना नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच हवे होते. त्यामुळे युतीचे घोडे अडले होते.

या दरम्यान दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या संमतीने भाजप व शिवसेना अशी युती जवळपास निश्चित झाली होती. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे रुपेश दराडे उमेदवार राहतील अशीही बोलणी झाली होती. पण छगन भुजबळ यांनी थेट रुग्णालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि आख्खा गेमच फिरवला. भुजबळ-फडणवीस दोघांचे संबंध चांगले असल्याने येवल्यात भाजपने अखेर राष्ट्रवादीला साथ दिली. भाजप व राष्ट्रवादीची युती झाली. राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरले. तर उपनगराध्यक्षपद भाजपला दिलं जाईल असा शब्द युतीच्या चर्चेदरम्यान भुजबळांनी दिला होता.

Devendra fadnavis, chhagan bhujbal
Yeola Election Result : भुजबळांनी हॉस्पिटलमधून गड राखला, राजेंद्र लोणारींचा दणदणीत विजय.. दराडे बंधूंना चारली धूळ..

पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 11 व भाजपने 3 जागांवर विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर आता भुजबळांनी भाजपला दिलेला शब्द पाळला असून उपनगराध्यक्षपद भाजपला दिले आहे. उपनगराध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका पुष्पा गायकवाड यांची सोमवारी (ता. १२) बिनविरोध निवड करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: गायकवाड यांचे नाव जाहीर केले. मंत्री गिरीश महाजन यांनीही गाडकवाड यांचेच नाव सुचवले होते.

Devendra fadnavis, chhagan bhujbal
Yeola Election : भुजबळांनी हॉस्पिटलमधूनच थेट CM फडणवीसांना फोन फिरवला; येवल्यात निवडणुकीचं चित्रच पालटलं...

तसेच येवल्यात स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून होते. त्यासाठी इच्छुकांकडून फील्डींग लावली जात होती. स्वीकृत नगरसेवकपदाच्या तीन जागांवर शिवसेनेकडून रूपेश दराडे, भाजपचे समीर समदडीया, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमजद शेख यांची निवड करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com