Girish Mahajan & Akhada Parishad Sadhu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: अखेर गिरीश महाजन यांची साधूंपुढे नतमस्तक, म्हणाले, ‘सांगाल तसेच करू’

Girish Mahajan; Minister Girish Mahajan assured Aakhada Parishad sadhus on kunbhmela arrangements-सिंहस्थ कुंभमेळा तयारी संदर्भात आखाडा परिषदेच्या प्रतिनिधींची त्र्यंबकेश्वरला बैठक

Sampat Devgire

Girish Mahajan News: सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्याआधीच तयारीच्या बैठकीच्या आधीच नवा वाद निर्माण झाला होता. सिंहस्थ कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा यांसह अनाधिकृत साधूंची भेट त्याला कारणीभूत ठरली होती. आज या संदर्भात झालेल्या बैठकीत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काल रात्री त्र्यंबकेश्वरला मुक्कामी आले होते. त्यांनी साधूंची नाराजी दूर करण्यासाठी व्यक्तिशः त्यांच्या भेटी घेतल्या. साधूंचे प्रश्न आणि अपेक्षा यासंदर्भात महाजन यांनी नमती भूमिका घेतली. विविध साधूंच्या अपेक्षा आणि सुविधा याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

अखंड परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे कुंभमेळा तयारीची बैठक झाली. तत्पूर्वी आखाडा परिषदेच्या साधूंनी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागात जाऊन समस्या दाखवल्या. त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन पूजा देखील केली. पूजा महाजन यांना पावली.

बैठकीनंतर मंत्री महाजन यांनी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी सर्व सुविधा पूर्ण केल्या जातील. आमचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर शासनाने काम देखील सुरू केले आहे. स्वतः मुख्यमंत्री या संदर्भात जागरूक आहेत.

आखाडा परिषदेने सूचना केल्याप्रमाणे सर्व कामे केले जातील. यंदाचा कुंभमेळा राज्य शासनाच्या दृष्टीने देखील प्रतिष्ठेचा आहे. प्रयागराज या धर्तीवर सर्व सुविधांचे अवलोकन केले जाईल असे मंत्री महाजन यांनी सांगितले. या बैठकीपूर्वी आखाडा परिषदेचे साधू आणि स्थानिक अधिकाऱ्यांचीही काल सायंकाळ पासूनच चर्चा सुरू होती. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सायंकाळीच त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. परिषदेच्या वाद आणि तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने महाजन यांनी सावध पावले टाकले.

आखाड परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र पुरी महाराज, सचिव हरी गिरी महाराज, षडदर्शन आखाडा परिषदेचे प्रमुख शंकरानंद सरस्वती, महंत रवी पुजारी, त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्व दहा आखाड्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी साधू आणि महान त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या.

विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलद शर्मा, यांचं विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT