Sanjay Raut Politics: शिवसेना ठाकरे पक्षाकडून ग्रामीण नेत्यांची उपेक्षा? शहरात पदांची खैरात, पक्ष वाढणार तरी कसा?

Shivsena UBT; Shivsena going City centric, rural leadership keep out of track-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ग्रामीण भागावर वरचष्मा होण्याची चिन्हे.
Shivsena UBT; Shivsena going City centric, rural leadership keep out of track-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ग्रामीण भागावर वरचष्मा होण्याची चिन्हे.
Shivsena UBT; Shivsena going City centric, rural leadership keep out of track-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ग्रामीण भागावर वरचष्मा होण्याची चिन्हे. Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT news: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रित करीत आहे. त्यासाठी पक्षात पदाधिकाऱ्यांची खांदेपालट अपेक्षित आहे. त्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.

नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कारभार एखादी संपर्क नेते संजय राऊत यांच्याकडे आहे. या पक्षाला गेल्या विविध निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता मोठे यश मिळालेले नाही. पदाधिकाऱ्यांतील विस्कळीतपणा त्याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

Shivsena UBT; Shivsena going City centric, rural leadership keep out of track-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ग्रामीण भागावर वरचष्मा होण्याची चिन्हे.
Nashik Kumbh Mela 2027: भाजपचे 'संकटमोचक' नाशिकच्या 'आखाड्यात'! कुंभात पहिलं शाहीस्नान कोण करणार?

या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा भाकरी फिरविण्याचा पक्षाचा विचार आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी शहरातील माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांची नुकतीच नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पदोन्नती दिली. माजी नगरसेवक विलास शिंदे शहराचे प्रमुख आहेत. दत्ता गायकवाड हे देखील पदाधिकारी आहेत.

Shivsena UBT; Shivsena going City centric, rural leadership keep out of track-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ग्रामीण भागावर वरचष्मा होण्याची चिन्हे.
Raj Thackeray Politics: मनसेने कंबर कसली, नाशिक शहरात भाजपला देणार कडवे आव्हान!

या सर्व पदाधिकाऱ्यांचा विचार करता शिवसेना ठाकरे पक्षाचे बहुतांशी पदाधिकारी शहरात कार्यरत आहेत. ग्रामीण भागाकडे पक्षाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे संघटनात्मक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी होऊ लागल्याचे चिन्ह आहे.

शिवसेना ग्रामीण भागाची धुरा यापूर्वी (कै) राजाभाऊ गोडसे, विजय करंजकर या नेत्यांकडे होती. लोकसभा निवडणुकीत करंजकर यांनी पक्ष सोडला. पाठोपाठ संजय तुंगार, बाजीराव जाधव, अनिल ढिकले या नेत्यांनीही अन्य पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिवसेनेत उद्धव ठाकरे पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे पक्ष अशी झुंज आहे. त्याचा फायदा विरोधकांना होत आहे.

शिवसेनेच्या ग्रामीण भागातील नेत्यांकडे पक्षाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. जिल्हाप्रमुख पद हे ग्रामीण भागासाठी असून देखील ते शहरातील नेत्यांकडे आहे. निवृत्ती जाधव (इगतपुरी), जगन आगळे (पळसे) यांसह विविध नेते सध्या उपेक्षित असल्यासारखी स्थिती आहे. ग्रामीण भागाच्या या नेत्यांना पदाधिकारी म्हणून नियुक्त का केले जात नाही, असा गंभीर प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका विचारात घेतल्यास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. सध्या शहरात पुन्हा खांदेपालट करण्याचा विचार सुरू आहे. त्यात मामा राजवाडे, भगवंत पाठक, अजय बागुल या शहरातील नेत्यांचीच नावे आघाडीवर आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सध्या राजकारणात सूर गवसने आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये लक्षणीय कामगिरी करावी लागेल. त्यासाठी ग्रामीण भागात नेत्यांना पदाधिकारी नियुक्त केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो हा विचार पक्ष नेतृत्व करेल का? याची चर्चा होत आहे

----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com