Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Scam : कुंभमेळ्याच्या कामांमध्ये बनावट वर्क ऑर्डरचे रॅकेट; 500 कोटींची फसवणूक, जळगाव-जामनेर कनेक्शन आलं समोर

Kumbh Mela Fake Work Order Scam : सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्व कामे ऑनलाईन टेंडर द्वारे दिली जातात. संदर्भात राज्य शासनाने स्वतंत्र विभाग केला आहे. कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाते. धुळे आणि जळगाव येथील चार ते पाच जणांच्या टोळीने आतापर्यंत ऑफलाईन वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केली आहे.

Sampat Devgire

Nashik News, 11 Aug : सिंहस्थ कुंभमेळा आणि त्यातील विकासकामे सातत्याने वादाचा विषय बनली आहेत. आता यामध्ये धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीच त्याची माहिती दिली.

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे 35 हजार कोटींची कामे सुरू आहेत. शासनाने त्यासाठी कुंभमेळा कक्ष निर्माण केला आहे. या विभागामार्फत सर्व कंत्राट आणि निविदा ऑनलाइन पद्धतीने होतात. यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा कामाच्या बनावट वर्क ऑर्डर दिल्याचे उघड झाले. प्रशासकीय स्तरावर दक्षता बाळगल्याने त्याचे बिंग फुटले.

या संदर्भात आता थेट कुंभमेळा मंत्री यांनीही काळजी व्यक्त केली आहे. जामनेर आणि जळगाव येथील असल्याचे सांगून कंत्राटदारांना ऑफलाइन वर्क ऑर्डर दिल्या जात आहे. यामध्ये चार ते पाच जणांची टोळी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ही टोळी आपण जळगावचे असल्याचे सांगून कंत्राटदारांना वर्क ऑर्डर देऊन वसूली करते.

या संदर्भात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या नावाचा यामध्ये गैरवापर झाला नाही असा दावा केला. संबंधित टोळी चार ते पाच जणांची असून ते आपण जामनेर आणि जळगावचे असल्याचे सांगतात. त्यामुळे कंत्राटदारांचा त्यावर विश्वास बसत असावा, असे सांगितले.

आतापर्यंत या कामांमध्ये संबंधित रॅकेट ने 500 ते 600 कोटींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे ही फसवणूक अत्यंत सफाईदारपणे केली जाते त्यात ऑफलाईन टेंडरची वर्क ऑर्डर दिली जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्व कामे ऑनलाईन टेंडर द्वारे दिली जातात. संदर्भात राज्य शासनाने स्वतंत्र विभाग केला आहे. कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाते. धुळे आणि जळगाव येथील चार ते पाच जणांच्या टोळीने आतापर्यंत ऑफलाईन वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केली आहे.

या संदर्भात जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुंभमेळा आयुक्तांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कुंभमेळ्याच्या कामात 500 ते 600 कोटींची फसवणूक झाल्याचे पुढे आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT