Girish Mahajan, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : निवडणुकीत दोनअंकी संख्या पार करून दाखवा.. नाशिकमधून महाजनांचे कुणाला चॅलेंज?

Nashik Municipal Election : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलं आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत विरोधकांना त्यांनी ओपन चॅलेंज केलं आहे.

Ganesh Sonawane

Nashik politics : भाजपचे संकटमोचक व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका निवडणुकीत विरोधकांना ओपन चॅलेंज केलं आहे. विरोधकांनी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची दोनअंकी संख्या पार करून दाखवावी असं आव्हान त्यांनी केलं आहे.

नाशिकमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ वा वाढदिवस निमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत शहरातील भाजप कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास महाजन यांनी भेट दिली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

महाजन म्हणाले, नाशिकमध्ये आठवडाभरात दोन मोर्चे निघाले. निवडणुका जवळ आल्या की, विरोधकांकडून मोर्चाचे नियोजन करून महायुतीविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु याने काही फरक पडणार नसून विरोधकांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. नाशिककरांचा विश्वास हा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचीच ताकद अधिक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ‘उबाठा’ या पक्षांनी महापालिका निवडणुकीत दोनअंकी संख्या पार करून दाखवावी असं चॅलेंज त्यांनी केलं.

महाजन पुढे म्हणाले, महायुती म्हणून आपण नाशिकसह राज्यभरात ताकदवान आहोत. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे उद्दिष्ट समोर ठेवून आपल्याला काम करायचे आहे. भाजपची मोठी ताकद असून, आपली संख्याही ताकदीला अनुसरून असायला हवी. महापालिकेत शंभर प्लसचे उद्दिष्ट ठरले असून, ते साध्य करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

दरम्यान यावेळी महाजन यांनी 'मोदी युवा रन' वरून बोलताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांगलीच फिरकी घेतली. देशभरात ७५ शहरांमध्ये रविवारी 'युवा रन' होणार आहे. नाशिकची निवडही त्यात झाली आहे. या रनमध्ये जो सर्वात पुढे असेल त्यालाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल. तसेच रनमध्ये पदक आणि प्रमाणपत्र दिले जाणार असून, निवडणुकीच्या वेळी तुम्हाला ते कामाला येणार आहे. हे बक्षीस निवडणुकीत खर्चाला कामाला येईल असं महाजन म्हणाले.

कुंभमेळ्याच्या कामांमध्ये क्लब टेंडरिंगमुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर बोलताना महाजन म्हणाले, कुंभमेळ्याची कामे ही अवधी कमी असल्याने दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच कुंभमेळ्याची काळजी विरोधकांनी करू नये. आम्ही काळजी घेत असून, टेंडरिंग प्रक्रियेसह कामे सुरू असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT