
Maharashtra politics : जळगावात काल बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला. आक्रमक आंदोलक बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडून थेट आत शिरले. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शिरुन घोषणाबाजी केली, यावेळी काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी, तसेच विविध समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मोर्चा काढला. बच्चू कडू व माजी खासदार उन्मेश पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं. बच्चू कडू यांनी यावेळी डोक्यावर काळी पट्टी बांधून सरकारवर आगपाखड केली. यावेळी मंत्र्यांना नालायक म्हणत बच्चू कडू यांनी आपल्या मोर्चातील भाषणाला सुरुवात केली. शेतकरी अडचणीत असताना कुणा एकालाही वाटू नये की, आपण आता किमान आवाज तरी केला पाहीजे. इतके नालायक आमचे नेते आहेत असं बच्चू कडू म्हणाले.
यावेळी बच्चू कडूंनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवरही निशाणा साधला. गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक झाले पण शेतकऱ्यांचे होऊ शकले नाही. हे सगळे गुलाम आहेत. हा जोऱ्याने आवाज करणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही. नाही वरतून तर खालू तर काढ अशी बोचरी टीका त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केली.
नेपाळ सारखं नाही करणार आम्ही. तुमची घरं नाही पेटवणार, तुम्हाला मारणार नाही. पण तुमच्या घरापर्यंत नक्की येऊ असा इशारा यावेळी त्यांनी मंत्र्यांना दिला. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी हजार गुन्हे दाखल झाले तरी चालेल, पण मागे हटणार नाही असं यावेळी बच्चू कडू म्हणाले.
जगाच्या पोशिंदा आज संकटात आहे. त्याला न्याय मिळाला पाहिजे. जिल्ह्यात चार मंत्री असून, कुणीही लक्ष देत नाही. शेतकऱ्यांचे अस्तित्व संपण्याची वेळ आली आहे. आपल्यालाच आवाज उठवावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, नफा होत नाही, म्हणून ते कर्जबाजारी होत आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच ही वेळ आली. योग्य भाव मिळाला असता, तर तुमचे कर्जही फेडले असते. तुम्ही लुटलं नसतं तर तुमच्या बापाचेही कर्ज फेडले असते. हमीभाव जाहीर करायचा पण खरेदी होऊ द्यायची नाही असे सरकारचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.