Honey-Trap-News- Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Honey trap scandal: हनी ट्रॅप प्रकरणात भाजपच्या दोन मंत्र्यांचा उल्लेख करून सरकारची झोप उडवण्यात संजय राऊत यशस्वी?

Girish Mahajan; Political drama & allegations begin between Eknath Khadse and Minister Girish Mahajan - "हनी ट्रॅप"चे केंद्र जामनेर आणि नाशिक असल्याने ते भाजपचे ते दोन मंत्री कोण? याचीच सध्या चर्चा.

Sampat Devgire

Honey trap News: गेले काही दिवस चर्चेत असलेल्या हानी ट्रॅप चा जीन बाटलीतून बाहेर येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांपासून प्रमुख मंत्री या प्रकरणातील हवा काढण्यासाठी धावा धाव करीत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट भाजपचे दोन मंत्री सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

हनी ट्रॅप प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी सोमवारी महायुती सरकारची कोंडी करणारा आरोपांचा बॉम्ब फोडला. या प्रकरणात त्यांनी महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भाजपचे दोन मंत्री या प्रकरणात अडकलेले असल्याचा दावा राऊत यांनी केला. या रूपानंतर राज्यभर सर्व लक्ष या एकमेव प्रकरणावर केंद्रित झाले आहे.

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अनेक आरोप केले. तपशील दिला. मात्र कोणाचेही नाव घेण्याचे टाळले. त्यामुळे जामनेर येथील लोढा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर नाशिकचा मास्टर माईंड कोण? याची मोठी उत्सुकता सगळ्यांना आहे.

हनी ट्रॅप प्रकरणात पहिला गुन्हा मुंबईच्या अंधेरी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी भाजपचा सक्रिय पदाधिकारी आणि जामनेर येथील असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हनी ट्रॅप चे केंद्र नाशिक आणि जामनेर असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आपोआपच भाजपचे दोन मंत्री कोण? याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात हनी ट्रॅप नाही असे वारंवार सांगितले जात आहे. त्याचवेळी पोलीस मात्र अचानक सक्रिय झाल्याचे दिसून येते. याबाबत कोणत्याही नोंदी किंवा तक्रारी दाखल होणार नाहीत याची पुरेशी काळजी घेतली जात आहे. याबाबत हनी ट्रॅप प्रकरणात राजकीय नेत्यांसह पोलिस उच्चपदस्थ अधिकारीही असल्याने अनेक अधिकाऱ्यांना देखील घाम फुटला आहे.

सोमवारी जामनेर येथे तीन ते चार ठिकाणी पोलिसांनी काल तपासणी केली. काही जणांची विचारपूस देखील झाली. मात्र धक्कादायक म्हणजे नाशिकच्या केंद्रस्थानी असलेला दुसरा नेता सध्यातरी परागंदा झाल्याचे कळते. संबंधित नेता कुठे आहे याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. यासंदर्भात कुठेही वाच्यता होणार नाही याची पुरेशी काळजी तपास यंत्रणा म्हणून पोलीस घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी बंगरूळ येथे एकाला ताब्यात घेतल्याची अफवा होती. प्रत्यक्षात मात्र कोणीही त्यावर माहिती देऊ शकलेले नाही.

हनी ट्रॅप प्रकरणाचे केंद्र जामनेर आणि नाशिक असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे यामध्ये अडकलेले भाजपचे मंत्री कोण? याबाबत दिवसभर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांमध्ये कैयास बांधले जात होते. अनेकांनी नाव न घेत आहे हे दोन मंत्री कोण असू शकतात? असे सूचक विधान करीत राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT