Malikralao Kokate Politics: रोहित पवार यांचे 'ते' ट्विट वर्मी बसले... राष्ट्रवादीतील असंतुष्टच माणिकराव कोकाटे यांचा बळी घेणार?

Manikrao Kokate; Will the game of wild rummy take down Manikrao Kokate's wicket?-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विरोधकांपेक्षाही पडद्यामागून सुत्रे हलवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकारीच अधिक सक्रीय झाले?
Maanikrao-Kokate-Rummy-Controversy
Maanikrao-Kokate-Rummy-ControversySarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate news: आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे छायाचित्र 'एक्स' वर टाकले होते. खरे तर हा सहज घेण्याजोगा विषय होऊ शकला असता. मात्र राजकीय गॉडफादर नसल्याने माणिकराव कोकाटे रोहित पवार यांच्या 'त्या' पोस्टने चहूबाजूंनी घेरले गेले आहेत.

पावसाळी अधिवेशनाचे सुप वाजले. त्यात अधिवेशनातील कामकाज ऐवजी अचानक कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याच्या पाच-सात सेकंदाच्या व्हिडिओने खळबळ उडवली. राज्याच्या राजकारणात हनी ट्रॅप ला मागे टाकण्यासाठी कृषिमंत्री कोकाटे यांचा हा व्हिडिओ सध्या तरी कदाचीत सरकारची गरज म्हणून मायलेज घेत आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात समाज माध्यमांवर टीकेचा अक्षरशा पाऊस पडत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कृषिमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. त्यात काँग्रेसने तेल ओतण्याचे काम केले. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मोठा दबाव आहे. यामध्ये पक्षातील कोकाटे विरोधक शांतपणे या खेळाचा आनंद घेण्यात मग्न असल्याचे चित्र आहे.

Maanikrao-Kokate-Rummy-Controversy
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची आता गरज संपली! पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

कृषिमंत्री कोकाटे सातत्याने टिकेचा आणि चर्चेचा विषय राहिले आहे. हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला साजेशेच असे आहे. मात्र आता ते सिन्नर विधानसभा मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कार्यरत असल्याने त्याचे वेगळे परिणाम पुढे आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील डॉ राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांपासून तर भाजपच्या विविध सदस्यांनी कोकाटे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या तुलनेत नाशिक मधील त्यांचे सहकारी मित्र व मंत्री तेवढ्या आक्रमकतेने पुढे आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील अन्य मंत्र्यांनीही याबाबत सूचक म्हणून बाळगले आहेत. किंबहुना भावी कृषी मंत्री म्हणून संजय बनसोडे यांच्या नावाच्या बातम्या देखील पेरल्या जात आहेत.

अनेक सदस्य त्यांच्या मदतीला धावून आले काही शांतपणे हे सर्व पाहत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोली आणि दिलेली प्रतिक्रिया राजकारणात मुरलेल्यांसाठी कृषी मंत्री कोकाटे यांना इशारा आहे हे वेगळे समजण्याचे कारण नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यामुळेच बॅक फुटवर गेल्याचे सध्याचे चित्र आहे.

एकंदरच समाज माध्यमांवरील ‘जंगली रमीपे आवोना महाराज’ ही उपरोधीक टॅगलाईन कृषिमंत्री कोकाटे यांना राजकीय जखमा करू लागली आहे. मंत्री कोकाटे यांच्या स्वभावाप्रमाणे ती हलक्यात घेता येणार नाही. या जखमेवरचा इलाज आजच्या घडीला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपेक्षाही मुख्यमंत्र्यांच्या इच्छेवर ते अवलंबून असेल.

या संदर्भात रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणले, या राजकीय अँगलने सुद्धा त्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे पडद्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच अनेक नेते कोकाटे यांच्या विरोधात अचानक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातून वाचविण्यासाठी कोण कोकाटे यांच्या मदतीला धावून येतो याची उत्सुकता आहे. संकट काळात धावून यावा असा मित्र राज्याच्या मंत्रिमंडळात पक्षात आणि राजकारणात कोकाटे यांनी तयार केला आहे का? याचे उत्तर या निमित्ताने मिळू शकते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com