Girish Mahajan challenge to Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan: गिरीश महाजनांचे राऊतांना थेट चॅलेंज; ‘जामनेर पॅटर्न’चा आरोप फेटाळत म्हणाले, 'ZPमध्ये ताकद दाखवा!'

Girish Mahajan challenges Sanjay Raut: संजय राऊतांनी केलेला ‘जामनेर पॅटर्न’चा आरोप गिरीश महाजनांनी फेटाळला. जिल्हा परिषद निवडणुकीत ताकद दाखवण्याचे राऊतांना आव्हान.

Sampat Devgire

Sanjay Raut Girish Mahajan political clash: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामकाजावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी गिरीश महाजन यांना पुन्हा टार्गेट केले. त्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात भ्रष्टाचाराचा 'जामनेर पॅटर्न'सुरू आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेना ठाकरे पक्षातर्फे महापालिका विरोधात सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री महाजन यांच्यावर राऊत यांनी आरोप केला होता.

विरोधक आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मंत्री गिरीश महाजन यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे. विशेषतः सिंहस्थाच्या निविदांमध्ये बनावट वर्क ऑर्डर देण्याचा गैरप्रकार घडला आहे. त्यात मंत्री महाजन यांच्या नातेवाईकासह जामनेर येथील पाच जणांना अटक झाली.

या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात 'जामनेर पॅटर्न' सुरू असल्याचा आरोप केला होता. मोठ्या प्रमाणावर आरोप होत असताना मंत्री महाजन मात्र कॉन्फिडंट आहेत. त्यांनी हे आरोप एका झटक्यात फेटाळले आहेत.

मंत्री महाजन यांनी राऊत यांना आव्हान दिले. लवकरच राज्यात आणि विशेषता नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेना ठाकरे पक्ष आणि राऊत यांच्यात क्षमता असेल तर त्यांनी या निवडणुकीत आपली ताकद दाखवावी, असे ते म्हणाले.

खासदार राऊत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष दोघांचाही आत्मविश्वास हरवला आहे. या पक्षाकडे आता केवळ दोन खासदार आहेत. तरीही ते पंतप्रधान, न्यायालय, निवडणूक आयोग कोणालाही सोडत नाहीत. प्रत्येकावर आरोप करण्याची त्यांची शैली आहे. त्यामुळे त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही, याचा पुनरुच्चार मंत्री महाजन यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT