Girish Mahajan, Eknath Khadse. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : कमरेच्या खाली वार केल्याशिवाय.., गिरीश महाजन खडसेंवर संतापले

Eknath Khadse Vs Girish Mahajan : मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करतील. घरातील गोष्ट आहे पण मी बोलणार नाही, मला बोलायला भाग पाडू नका असा इशारा महाजन यांनी दिला.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : 'गगनभेदी'चे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा दाखला देत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत आज धक्कादायक असा गौप्यस्फोट केला आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपण याबाबत विचारणा करणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यानंतर आता एकनाथ खडसेंचा गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाजन म्हणाले, कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचं असेल तर निघणं मुश्किल होईल. त्यांचं सगळं संपलेलं आहे. त्यांचे दुकान बंद झालेलं आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात असं महाजन म्हणाले.

महाजन म्हणाले, कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. मी जर खडसेंवर तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. ते एक नंबरचे महाचोर आहेत. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील. घरातील गोष्ट आहे पण मी बोलणार नाही, मला बोलायला भाग पाडू नका असा इशारा महाजन यांनी दिला.

ते ज्येष्ठ आहेत वयाने मोठे आहेत बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावं, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं. जे सत्य असेल ते बोला. मात्र काही नसताना लोकांना खोट्या बातम्या द्यायच्या. वारंवार ते म्हणतात माझ्याकडे हे आहे ते आहे. त्यांनी एकतरी पुरावा द्यावा बिनबुडाचे आरोप करु नये.

मी त्यांच्यासारखे खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरेखालची भाषा शोभत नाही. मी सात वेळा आमदार आहे मंत्री आहे, त्यामुळे हे बघून त्यांची जळफळाट होत आहे. त्यांचे खूप वाईट दिवस आले आहेत. सर्व बघून त्यांची जळफळाट होत आहे. त्यामुळे ते वाटेल ते बेभान स्टेटमेंट करत असल्याचे महाजन म्हणाले.

अमित शहा यांना काय पुरावा दाखवता पुरावा दाखवायचाच असेल तर तो लोकांना दाखवा. यांना दिले त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते डिलीट झाले मोबाईल हरवला हे हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल करत माझं आव्हान आहे, की खडसेंनी एक पुरावा दाखवावा. मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल असं महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT