Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन यांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसेंनी फोडला नवा बॉम्ब

Jalgaon Politics Eknath Khadse Vs Girish Mahajan : जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकनाथ खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघांकडूनही सातत्याने एकमेकांवर कुठले न् कुठले आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र एकनाथ खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी व्हायरल केलेल्या क्लीपच्या आधारावर खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या बाबतची कल्पना असून आपण त्यांना यासंबधी भेटून विचारणा करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
Nashik News : राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांना आवर घालण्यासाठी नाशिकचे साधू-महंत एकवटले, केली मोठी मागणी

एकनाथ खडसे म्हणाले, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या 'रंगल्या रात्री अशा' त्यात त्यांनी डेटेल मध्ये म्हटलं आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे, मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होतं.

अमित शहा यांनी स्वत:गिरीश महाजन यांना याबाबत विचारणा केली होती. त्यावर महाजन यांनी सांगितले की, माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांशी बोलणे सुरु असते. पण शहांनी त्यांना सांगितले की, तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहे. त्यावर रात्री एक वाजेनंतरही तुमचे कॉल झालेले दिसत आहेत. दिवसभरात शंभर-शंभर वेळा कॉल झालेले आहेत. सीडीआर खरं बोलत आहे. त्या महिलेशी तुमचा काय संबंध? असे थेट अमित शहा यांनी महाजन यांना सुनावल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी अनिल थत्ते यांच्या क्लीपचा हवाला देत केला.

एकनाथ खडसे म्हणाले, माझ्या अमित शहांसोबत भेटीगाठी होत असतात. मी त्यांना भेटून याबाबत चर्चा करणार आहे. मला वाटते की खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे मागचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल.

Eknath Khadse & Girish Mahajan
Sahyadri Sugar factory : सह्याद्री कारखान्याच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटलांचा पॅनेल एक ते दीड हजार मतांनी आघाडीवर

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी फोडलेल्या या नव्या बॉम्बमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर महाजन विरुद्ध खडसे ही लढाई अधिक तीव्र होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर गिरीश महाजन काही स्पष्टीकरण देता का तेही बघावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com