Jalgaon News : चाळीसगावात भारताचे पहिले उपपंतप्रधान, देशाची एकता आणि अखंडतेचे प्रतीक, लोहपुरूष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने Run for Unity या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्पर्धकांसोबत मंत्री गिरीश महाजन देखील धावले. त्यांची रनिंग पाहून तरुण देखील थक्क झाले.
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिवस "राष्ट्रीय एकता दिन" म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने चाळीसगाव शहर पोलिसांच्या वतीने "Run for Unity : एक दौड देश की एकता और अखंडता के लिए" या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी गिरीश महाजन यांनीही रनिंग करत सहभाग घेतला. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच, हा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल चाळीसगाव शहर पोलिस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी गिरीश महाजन यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, मी नेहमी माझ्या भाषणात उल्लेख करत असतो की, आपला देश हा जगातील सर्वांधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या आपल्याकडे मोठी आहे. हा तरुण व्यसनापासून दूर असला पाहीजे अशी आमची भावना आहे. दररोज सकाळी पळालं पाहीजे, व्यायाम केला पाहीजे. तरुणांनी तंदुरुस्त व व्यसनमुक्त राहायला हवं असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
जगात सर्वात जास्त तरुण आपल्या देशात असले तरी पण जर हे तरुण व्यसनाधिन झाले. त्यांच्या हाता-पायात जोरच राहीला नाही. तर हे तरुण काही कामाचे नाही. पण व्यसनांपासून दूर रहा व निरोगी रहा असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
गिरीश महाजन यांच्या फिटनेसंदर्भातील चर्चा याआधीही अनेकदा झाल्या आहेत. वय वर्ष ६५ असूनही गिरीश महाजन येवढे फिट कसे असा प्रश्न एकदा त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर महाजन यांनी त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले होते.
ते म्हणाले होते की, गेल्या ४० वर्षांपासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याने मी खूप वयोवृद्ध झालेलो नाही. आजवरच्या आयुष्यात एकदाही चहा पिलो नाही. मद्य किंवा धूम्रपान करीत नाही. तेलकट व तळलेले पदार्थ खाणे वर्ज्य केले आहे. सकाळी पाच ते सात किलोमीटर चालणे, धावणे असा व्यायाम नियमितपणे सुरू असल्याने माझा 'फिटनेस' टिकून असल्याचे रहस्य मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर उघड केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.