Nashik ZP Election : उदय सांगळे, सुनीता चारोस्करांनी कमळ हाती घेण्याआधीच तुतारी वाजली, दोघांना एकाचवेळी दणका

Uday Sangle, Sunita Charoskar : दोघेही भाजपमध्ये प्रवेश करत आहे हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दोघांची एकाचवेळी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Sunita Charoskar, Uday Sangle
Sunita Charoskar, Uday SangleSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिन्रर येथील युवानेते उदय सांगळे हे पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश करणार आहेत. तसेच दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी केलेल्या सुनीता रामदास चारोस्कर या देखील भाजपचे कमळ हाती घेणार आहे. परंतु त्यापूर्वीच पक्षाने दोघांवर हकालपट्टीची कारवाई केली आहे.

उदय सांगळे यांनी विधानसभेला सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी केली होती. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांना त्यांनी टक्कर दिली होती. उदय सांगळे यांनी कोकाटेंच्या विरोधात लाखभर मते मिळवली होती. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी जातीय समीकरणे विचारात घेऊन त्यांच्याशी दगाफटका केल्याचा आरोप झाला होता. त्यातूनच त्यांचा निवडणुकीत पराभव झाल्याचे बोलले गेले. आगामी जिल्हा परिषद निवडणुक लक्षात घेऊन ते आता भाजपात प्रवेश करत आहे.

सिन्रर शहरातील आडगाव फाटा मैदानावर येत्या सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती उदय सांगळे भाजपात प्रवेश करणार आहेत.

Sunita Charoskar, Uday Sangle
Nashik ZP : दादांच्या राष्ट्रवादीला रोखण्यासाठीच कोकाटेंच्या तालुक्यात भाजपचे ऑपरेशन लोटस, आतापर्यंत दोन तगडे मोहरे गळाला

तर दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात देखील भाजपने मोठी राजकीय खेळी केली असून माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांच्या भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित केला आहे. सुनीता चारोस्करांनी दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी केली होती. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी त्यांचा पराभव केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता त्याही भाजपात प्रवेश करत आहेत. येत्या ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, संस्कृती लॉन्स, दिंडोरी येथे चारोस्कर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

त्यामुळे भाजपप्रवेशाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून दोघांची हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी दोघांच्या हकालपट्टीचे पत्र जारी केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उदय सांगळे व सुनीता चारोस्कर यांनी भाजपचा मार्ग निवडला आहे.

Sunita Charoskar, Uday Sangle
Kokate Rummy Video : कोकाटे रमी व्हिडीओ प्रकरणाचा तपास अजून अपूर्ण, अहवाल देण्यास पोलिसांनी मागितली चार दिवसांची मुदत

दरम्यान या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पक्ष कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यात सतत पक्ष बदलाची मानसिकता असलेल्या नेत्यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सांगळे व चारोस्करांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com