Sharad Pawar, Girish Mahajan, Eknath Khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan News : गिरीश महाजनांचा दे धक्का! विरोधकांकडे उमेदवारच ठेवला नाही!

Sanjay Garud Join BJP : महाविकास आघाडीचा सर्वात चर्चेत असलेला उमेदवार थेट सत्ताधारी पक्षाला शरण गेल्याने महाजन निर्धास्त झाल्याचे वातावरण जामनेर विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे.

Sampat Devgire

Political News: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपासाठी चर्चा सुरू आहे. तर इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात देखील केली आहे. पण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात मात्र विरोधकांना 'उमेदवार देता का उमेदवार' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. विरोधात असणाऱ्या उमेदवारांचा गिरीश महाजन भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्याचा सपाटाच लावला आहे. (Girish Mahajan News :)

गिरीश महाजन (Girish Mahajan )यांनी आपल्या घरच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या विरोधात निवडणुक लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) संजय गरुड यांचा भाजपमध्ये प्रवेश नुकताच घडवून आणला. त्याआधी जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil ) व त्यांची कन्या डॉ.केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यासाठी देखील महाजन यांनी पुढाकार घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) संजय भास्करराव गरुड यांनी नुकतेच महाजन यांचे नेतृत्व मान्य करीत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी गरुड यांना काँग्रेस आघाडीतर्फे जामनेर मतदार संघातून महाजन यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. महाजन यांचे विरोधक म्हणून गरुड उभे राहत होते. एकदा अपक्ष म्हणून देखील महाजन यांच्या विरोधात लढले. तर, गेल्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून गिरीश महाजन यांच्या विरोधात लढले होते. या तिन्ही निवडणुकांमध्ये गरुड यांचा पराभव झाला होता.

महाविकास आघाडीचा सर्वात चर्चेत असलेला उमेदवार थेट सत्ताधारी पक्षाला शरण गेल्याने महाजन निर्धास्त झाल्याचे वातावरण जामनेर विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे. ग्रामविकास मंत्री महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा भाजपच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला ते वैद्यकीय कामकाजातून मोठे सहाय्य करतात. विकास कामांच्या माध्यमातून देखील त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजपचे प्रभावी आणि प्रबळ उमेदवार म्हणून महाजन यांचा धबधबा मतदारसंघात कायम आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आघाडीला आता नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

'हे' असतील उमेदवार

सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) एकनाथ खडसे यांना महाजन यांच्या विरोधात नव्या उमेदवाराचा शोध घेताना अडचणी येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे एस.टी.पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) डॉ.प्रशांत पाटील (लासर) आणि डी. के. पाटील (तोंडापूर) हे तीन उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून आगामी निवडणुकीत महाजन यांच्या विरोधात उमेदवारी असू शकतात. मात्र त्यासाठी विरोधकांना सावध राहावे लागणार असून यातील अन्य काही उमेदवार भाजपमध्ये जाऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT