काँग्रेस नेते डॉ. उल्हास पाटील येत्या दोन दिवसांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत रावेर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस सोडण्यामागे उमेदवारी नव्हे, तर वेगळेच कारण असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा आहे. त्यामागे भाजप नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Sharad Pawar Gat) विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे यांच्यातील तीव्र राजकीय स्पर्धा कारणीभूत आहे. या राजकारणामुळे येत्या काही दिवसांत आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लोकसभेची उमेदवारी हे प्रमुख कारण असेल.
काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या रावेर लोकसभा मतदारसंघातील 'इंडिया' आघाडीच्या अर्थात काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत होत्या. येत्या 24 जानेवारीला त्या भाजपमध्ये प्रवेश करतील. साहजिकच भाजपप्रवेशामागे लोकसभेची उमेदवारी असावी, असा राजकीय कयास लावण्यात आला होता. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नव्याने आलेल्यांचा उमेदवारीसाठी लगेच विचार होईल, ही शक्यता नाकारली आहे. त्यामुळे काँग्रेसचे डॉ. पाटील यांच्या काँग्रेस सोडण्याचे कारण वेगळेच असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. पाटील यांच्या गोदावरी संस्थेचे रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय आहे. अन्य काही शिक्षण संस्थांचादेखील कारभार ते पाहतात. या कामकाजात काही अडथळा नको, म्हणून तर डॉ. पाटील भाजपमध्ये गेले नसावेत ना? अशीदेखील एक चर्चा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये आधीच उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. यामध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे या प्रमुख इच्छुक आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांत फडणवीस यांच्या अनुलोम या संस्थेमार्फत पंचधातूच्या श्रीरामाच्या मूर्तींचे रावेर मतदारसंघात वाटप करणारे डॉ. कुंदन फेगडे हेदेखील एक इच्छुक आहेत. त्यांनी यापूर्वीच आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
याशिवाय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र आणि जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे एक प्रबळ दावेदार मानले जातात. उमेदवारीसाठी भाजपमध्ये या उमेदवारांत जोरदार रस्सीखेच आहे. अशा स्थितीत नव्याने येणाऱ्या डॉ. पवार यांना उमेदवारी मिळणार काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
edited by sachin fulpagare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.