Eknath Khadse-Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत नेऊन दाखवावे : एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर

कोरोनावरून सुरू झालेली दोन नेत्यांमधील टीकेची पातळी घसरली

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : नाथाभाऊंना (माजी मंत्री एकनाथ खडसे) ठाण्यात दाखविण्याची गरज नाही. पण, गिरीशभाऊंना (आमदार गिरीश महाजन, Girish Mahajan) पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला आहे. (Girish Mahajan should be shown in Pune's budhwar Peth : Eknath Khadse)

भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, ईडीकडून (सक्तवसुली संचनालय) अटक होणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला होता.

दरम्यान, आता गिरीश महाजन यांनी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच खडसे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे उट्टे काढत पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने महाजन यांना कोरोना झाला आहे, असा टोला लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवावे, अशी टीका केली होती. त्याला एकनाथ खडसे यांनी गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला लगावत उत्तर दिले आहे.

जळगावमध्ये मोका गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत. त्यांच्या घरांवर पुण्यातील पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. मोका गुन्ह्याच्या संदर्भात आज जी कारवाई सुरू आहे, त्यासंदर्भात आधिक माहिती घेण्यासाठी हे छापे असावेत, असे मला वाटते. आज जी मोका गुन्ह्याच्या संदर्भात कारवाई सुरू आहे आणि मी काल जे वक्तव्य केले आहे, त्याचा याच्याशी दुरान्वये संबंध नाही. तो केवळ योगायोग समजावा, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT