‘आमचं नवीन ठरलंय’ : संजय मंडलिकांच्या घोषणेने सतेज पाटलांना इशारा

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या संचालकांचा सत्कार
satej Patil-sanjay mandlik
satej Patil-sanjay mandlikSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : सहकारात काम करताना अनेकांशी संबंध ठेवावे लागतात. पण, काहींना या मैत्रीमध्ये काही दम नसल्याचे वाटू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय, हे घोषवाक्‍य होते. यातून आम्ही बाजूला झालेलो नाही. पण, कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, बाजार समितीसह आगामी इतर निवडणुका लढवायचे हे ‘आमचं नवीन ठरलयं,’ हे लक्षात ठेवावे. हेच नवीन ठरलेले आम्ही टोकापर्यंत घेऊन जाण्याचे काम भविष्यातील निवडणुकांमध्ये करणार आहोत, असा इशारा खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) यांनी पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांचे नाव न घेतला दिला. (Newly elected director of Shiv Sena felicitated who won Kolhapur District Bank election)

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या माजी आमदारांच्या नावापुढचे ‘माजी’ हा शब्द पूसुन काढण्यासाठी आतापासूनच जिल्ह्यातील नियोजन करणार असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनाप्रणित आघाडीच्या उमेदवारांचा सत्कार समारंभ येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संपर्कनेते अरूण दुधवडकर होते. 

satej Patil-sanjay mandlik
शिवसेना आमदार भाजप खासदाराला म्हणाले, ‘मंत्रिपदासाठी तुमची मोदी-शहांकडे शिफारस करतो’

खासदार मंडलिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेने आम्हाला साथ दिली. हीच साथ जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, बाजार समितीच्या निवडणुकीत उपयोगाला येणार आहे. ‘गोकुळ’मध्ये शिवसेनेचे सहा संचालक आहेत. शिवसेनेची सहकारात ताकद नसती, तर आमचे सहा संचालक कसे झाले? असाही सवाल मंडलिक यांनीया वेळी उपस्थित केला.

satej Patil-sanjay mandlik
आम्हाला कोणीही विचारत नाही : माझं सोडा; बबनदादांना तरी मंत्रिपद मिळायला हवे होते!

गोकुळमध्ये आमची ताकद आहे. पण जिल्हा बॅंकेत तुमची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही दोनच जागा घ्या म्हणून आमची बोळवण केली गेली. आमची ताकद असतानाही आम्हाला तीन जागा दिल्या नाहीत. शिवसेनेसह शेकाप, आरपीआयचे कार्यकर्ते प्राणपणाने लढल्यामुळे हा विजय मिळाला असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.

satej Patil-sanjay mandlik
परबांच्या आदेशानंतर प्रा. सावंत शिवसेनेत पुन्हा सक्रीय : पक्ष सोपवणार मोठी जबाबदारी!

या वेळी संपर्क नेते अरुण दुधवकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार सुरेश साळुंखे, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मंजित माने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com