Rajabhau waje On Nashik Kumbhmela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : हिंदी सक्तीच्या माघारीनंतर ठाकरेसेनेचा विश्वास वाढला; आता पुढचं टार्गेट सिंहस्थ कुंभमेळा, विरोधकांना केलं मोठं आवाहन

Thackeray Sena Gains Confidence After Hindi Rollback : हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला होता. त्यावर विरोधकांनी सरकार विरोधात रान उठवल्यानंतर राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. यानिमित्ताने नाशिकमध्ये सर्व विरोधीपक्षांची एकजूट पाहायला मिळाली.

Sampat Devgire

Nashik News, 01 Jul : मंत्री गिरीश महाजन यांची कार्यशैली नेहमीच राजकीय टीकेचा विषय राहिली आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाजन यांच्यावर थेट हल्ला केला आहे. त्यामुळे आगामी काळात विरोधकांचे राजकारण अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला होता. त्यावर विरोधकांनी सरकार विरोधात रान उठवल्यानंतर राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. यानिमित्ताने नाशिकमध्ये सर्व विरोधीपक्षांची एकजूट पाहायला मिळाली.

या पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्य शासनाला थेट इशारा दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिककरांचा आहे. मात्र राज्य शासन त्याला प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यापूर्वी झालेल्या बैठकांना मुख्यमंत्री तसेच त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे एकटेच सहभागी होतात. सत्ताधारी आमदारांना आणि अन्य मंत्र्यांना देखील त्यात निमंत्रण नसते. यावरून मोठ्या प्रमाणावर नाराजी असून ही नाराजी खासदार वाजेंनी उघडपणे व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार यावर नाखुश असले तरी त्यांनी स्पष्ट बोलण्याचे धाडस केले नव्हते. यानिमित्ताने खासदार वाजे यांनी राज्य शासनाला थेट इशारा दिला आहे. मराठी भाषेच्या आग्रहासाठी जसे विरोधकांनी एकजूट दाखवली अशीच एकजूट सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत दाखवावी लागेल.

नाशिकच्या सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखविली तर राज्य शासनाला झुकावेच लागेल. सिंहस्थ कुंभमेळा हा सध्या प्रायव्हेट लिमिटेड झालेला आहे. कुंभमेळ्याची अनेक कामे ठराविक हेतूने करण्यात येत आहेत. कामांबाबत नाशिकच्या लोकप्रतिनिधींना सहभागी केले जात नाही. हा नाशिककरांना कमी लेखण्याचा प्रकार आहे. तो आम्ही सहन करणार नाही असे खासदार वाजे म्हणाले.

कुंभमेळ्याच्या यापूर्वी झालेल्या बैठकांना देखील खासदारांना निमंत्रण दिलेले नव्हते. जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्करराव भगरे आणि काँग्रेसच्या डॉ शोभाताई बच्छाव (धुळे) हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत. कुंभमेळ्याच्या बैठकांना त्यांना डावलण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करण्यात आले आहे. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम हे त्याचे प्रमुख आहेत. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे या सर्व कामकाजावर एकतर्फी नियंत्रण असल्याने नाशिक शहरातील लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे चित्र आहे. या भावनेला सर्वात आधी खासदार वाजे यांनी वाट करून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT