Maharashtra BJP latest update: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रॅण्ड नेते व खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केलेल्या विधानावरुन मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना करोना काळात टीव्हीवर लाइव्ह येत संदेश देत होते. त्यावेळी भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत होते. परंतु,आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही लाइव्ह संदेश देत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.
कोरोना काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कधी घराबाहेर पडले नाहीत. अशा व्यक्तीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होऊच शकत नाही, अशी टीका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. राऊत काहीही विधान करतात, असा टोलाही महाजन यांनी लगावला.
महाजन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या भीषण संकटात मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे कधीही प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रत्यक्ष जनतेत राहून देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे राऊतांनी या दोघांची केलेली तुलना पूर्णपणे चुकीची आणि हास्यास्पद असल्याचं महाजन म्हणाले.
दरम्यान, मंत्री महाजन यांनी रस्त्यांची पाहणी केली तसेच पंचवटी परिसरातील खड्ड्यांमुळे प्राण गमावलेल्या दीपाली बेळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून आता युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या चार महिन्यांत नाशिकमधील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे झालेले दिसतील, असे आश्वासन त्यांनी नागरिकरांना दिले.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला आहे. दर वर्षी डांबरी रस्त्यांवर वाहनांचा भार आणि पावसामुळे खड्डे पडतात. त्यामुळे या वर्षी सर्व मुख्य रस्त्यांचे ‘व्हाइट टॉपिंग’ करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाही. कामांचा वेग वाढविण्यासाठी सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि केंद्रीय एजन्सींची तातडीची बैठक घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.