Rahul Dhikle, Girish Mahajan & Seema Hiray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांच्या मनात आहे तरी काय? निष्ठावंतांच्या उमेदवारीचा भार आता आमदारांवर?

Girish Mahajan; The burden of candidacy of loyalists now falls on MLAs Rahul Dhikle and Seema Hiray -भरमसाठ प्रवेशांनी भाजपचे निष्ठावंत इच्छुक झाले अस्वस्थ, अनेकांची झोप उडाल्याने पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांबाबत भावना तीव्र

Sampat Devgire

Girish Mahajan News: भारतीय जनता पक्षात रोज नव्या नेत्यांचा प्रवेश होत आहे. विश करणारे महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे निष्ठावंत आणि पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांचे काय होणार? हा प्रश्न निष्ठावंतांना सत्तावू लागला आहे.

भारतीय जनता पक्षात सध्या सगळ्यांना प्रवेशासाठी दारे खुली करण्यात आली आहे. यामध्ये शंभर प्लस जागांचा दावा महापालिकेसाठी करण्यात आला आहे. या दाव्यातून मंत्री गिरीश महाजन भाजपच्या विरोधकांचेही उत्साहाने स्वागत करीत आहेत. त्यांच्या या धोरणामागे नेमके दडलय तरी काय याची चर्चा आता सुरू झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील पराभूत उमेदवार गणेश गीते आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते व नाशिक पश्चिमचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश भाजपच्या नेत्यांना अस्वस्थ करीत आहे. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला स्थानिक आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे यांचा प्रखर विरोध होता.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे एका जागेसाठी अनेक जण उमेदवारीसाठी रांगा लावून उभे आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांचे येईल त्याला प्रवेश देण्याचे धोरण आहे. या स्थितीत पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेले आणि विधानसभा निवडणुकीत बडगुजर आणि गीते यांच्याशी संघर्ष केलेल्या नेत्यांचा उमेदवारीच्या अपेक्षांचा भार या दोन्ही आमदारांच्या शिरावर आला आहे.

गेल्या दोन आठवड्यात भारतीय जनता पक्षात प्रामुख्याने सिडको आणि पंचवटी परिसरातील वादग्रस्त नेत्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सर्व नेते महापालिकेत पदे भूषविलेली आणि वादग्रस्त कामकाजाच्या तक्रारी असलेले आहेत. या नेत्यांना भाजपला उमेदवारी द्यावीच लागणार आहे. अशा स्थितीत त्यांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे काय? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

या संदर्भात आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या बाबतची विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. मात्र माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाला त्या स्वतः उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतील राजकारणाचे संकेत स्पष्ट झाले आहेत.

नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांनी पूर्वाश्रमीच्या गणेश गीते यांच्या प्रवेशाबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली भूमिका मांडली होती. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यातूनच वरिष्ठ स्तरावर झालेल्या चर्चेतून आमदार ढिकले हे गणेश गीते यांच्या प्रवेशाच्या वेळी व्यक्तीच्या हजर होते. यातून गीते यांचा प्रवेश झाला मात्र ते किती पंख पसरवू शकतात याबाबत मर्यादा आत्ताच जाणवू लागल्या आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचे नेमके धोरण काय याविषयी माजी नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या प्रवेशांमुळे भाजपचे निष्ठावंत इच्छुक आणि माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या याबाबत अतिशय संतप्त भावना आहेत. निष्ठावंत कितीही संतप्त असले तरी सध्या व्यक्त व्हावे अशी स्थिती भाजपमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय घडणार याचा अंदाज बांधणे सगळ्यांनाच अवघड बनले आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT