Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: खानदेशच्या राजकारणात भाजप आणि गिरीश महाजन यांचेच वर्चस्व!

Girish Mahajan; The year that proved BJP & Girish Mahajan's dominance in khandesh-खानदेशच्या राजकारणात मावळत्या वर्षात काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपने केले वॉश आउट.

Sampat Devgire

Khandesh News: मावळत्या वर्षात खानदेशच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा आपला वरचष्मा सिद्ध केला. विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला खानदेशातून अक्षरशः वॉश आउट केले.

लोकसभा निवडणुकीत जळगाव मध्ये भाजपला जळगाव आणि रावेर हे दोन्ही मतदार संघ राखता आले. मात्र त्यांना मोठे आव्हान निर्माण करण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली होती. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (रावेर) आणि स्मिता वाघ (जळगाव) लोकसभेत पोहोचल्या.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे आव्हान असेल असे चित्र होते. याची जाणीव महायुतीला देखील झाली होती. त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन यंत्रणा उभी केली. त्यासाठी यंत्रणा राबली. त्याचे फळ त्यांना मिळाले अशी स्थिती आहे.

विशेष म्हणजे निवडणूक जिंकण्याचे तंत्र अवगत असलेल्या भाजपने त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्या तुलनेत अति आत्मविश्वासाने महाविकास आघाडीचे घटक पक्ष जागा वाटपातच आपली शक्ती खर्च करण्यात व्यस्त दिसून आले. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसला.

या सर्व घडामोडीत विविध समाज घटक नाराज असतानाही लाडकी बहीण योजनेने भाजपला तारले, अशी स्थिती राहिली. भाजपने साम-दाम दंड भेद या सर्व नीतीचा निवडणुकीत वापर केला. तेवढी ताकद आणि अर्थशक्ती महा विकास आघाडीकडे नव्हती, याची जाणीव निवडणुकीत दिसून आली.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ११ तर शिवसेना शिंदे गटाने ७ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला एकमेव जागा राखता आली. काँग्रेस पक्ष मात्र चार वरून एका जागेवर आले. महाविकास आघाडीला वीस पैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.

एकंदरच धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात काँग्रेसचा असलेल्या प्रभाव विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपुष्टात आणण्यात भाजप नेते डॉ विजयकुमार गावित यशस्वी झाले. या निवडणुकीत गावित यांच्या घरातील चार उमेदवार निवडणूक लढवत होते, हे विशेष. मात्र पक्षाने त्यांना मंत्री केले नाही.

धुळे जिल्ह्यातील चार आणि नंदुरबार जिल्ह्यातील पाच या सर्व नऊ जागांवर महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले. यामध्ये काँग्रेसच्या के. सी. पाडवी, कुणाल पाटील, शिरीष चौधरी या प्रस्थापितांना घरी बसावे लागले. काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक (नवापूर) हे एकमेव आमदार आता खानदेशात राहिले आहेत. भाजपने त्यांना धोबीपछाड दिली. जळगाव जिल्ह्यात देखील अशीच स्थिती राहिली.

शिवसेनेच्या माजी महापौर जयश्री महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, रोहिणी खडसे अशा दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागली. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाज यांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग केली.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या सात जागा राखल्या. एकंदरच जळगाव मध्ये महायुतीच्या सर्व विद्यमान आमदारांनी आपल्या जागा राखल्याने आता वीस पैकी केवळ शिरीषकुमार नाईक हे एकमेव आमदार काँग्रेसचे आहेत.

या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री आहेत. गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि संजय सावकारे हे भाजपचे तीन असे चार मंत्री खानदेशला मिळाले आहेत. या निमित्ताने प्रस्थापित डॉ विजयकुमार गावित यांना मात्र पक्षाने पुन्हा संधी दिली नाही. यातून त्यांनी गावित यांच्या स्वकेंद्रीत आणि स्वतःच्या कुटुंबाभोवतीच फिरणाऱ्या राजकारणाला संदेश दिला आहे.

यंदाचे वर्ष भारतीय जनता पक्षाला राज्यात आपली सत्ता अधिक भक्कम करण्यात यशस्वी ठरले. खानदेश मध्ये भाजपने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. आता महायुतीला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीने काय आडाखे बांधावेत असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे या निकालामुळे गिरीश महाजन हे खानदेशचे एक खांबी नेतृत्व ठरले आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना आता सत्तेचे महत्त्व माहित असल्याने महायुती खुणावू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेत गमावलेल्या जागांमुळे महाविकास आघाडीला पक्षांतराचे आणखी धक्के बसणार असे संकेत मिळू लागले आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT