Pahalgam Terror attack News: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने परिस्थिती बिकट झाली होती. काल या निषेधार्थ श्रीनगर मध्ये काश्मिरी लोकांनी दहशतवाद्यांच्या निषेधार्थ बंद पुकारला. आज वातावरण सुरळीत झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक आता परतीच्या दिशेने निघाले आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने काश्मीरमध्ये अडकले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मराठी पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तातडीने श्रीनगरला रवाना झाले होते. बुधवारी त्यांनी विविध यंत्रणांशी संपर्क केला.
या संदर्भात मुंबईत मंत्रालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडून काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि तेथील स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. बहुतांशी प्रशासकीय अधिकारी आणि पर्यटकांच्या संपर्कात राज्य शासनाचे हे अधिकारी आहेत. आज ही परिस्थिती पूर्ववत होण्यास सुरुवात झाल्याचे नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
सध्या काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील दीड हजार पर्यटक आहेत. सर्व पर्यटक श्रीनगर येथे आहेत. परिसर लष्कर तसेच पोलिसांच्या व्यवस्थेमुळे अत्यंत सुरक्षित मांनला जातो. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या पर्यटकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
आज श्रीनगर बंद मागे घेण्यात आला आहे. श्रीनगरला जोडणारा मुघल मार्ग काल सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत बंद होता. तो आता खुला आहे. त्यामुळे चार ते दहा अशा गटात पर्यटक जम्मूकडे रवाना होत आहेत. आज श्रीनगर येथून एक विशेष विमान महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सोडण्यात येणार आहे.
अन्य व्यवस्था देखील करण्यात येत असून नियंत्रण कक्ष या पर्यटकांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. विमान सेवा सुरळीत राहावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. संदर्भात मुख्यमंत्री देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा सक्रिय असल्याने काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. सर्व पर्यटक महाराष्ट्रात परततील तोपर्यंत आपण श्रीनगर येथेच मुक्काम करणार आहोत असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.