Maharashtra politics : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो शुक्रवारी (ता. १९) सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंत्र्यांच्या या कथित फोटोमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जळगाव पोलिसांनी या प्रकरणी तातडीने दखल घेत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
शुक्रवारी सकाळपासून एक्स, फेसबुकसह अन्य माध्यमांवर या छायाचित्रांसह काही बदनामीकारक, आक्षेपार्ह कमेंट्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. सदरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी तातडीने माध्यमांशी संवाद साधला. हे फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अधिकृतपणे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला.
काही विरोधकांनी जाणीवपूर्वक हे फोटो बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हायरल केले आहेत. हे फोटो एआय निर्मित असून मॉर्फ केलेले असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. मागचे लोक कट करुन मॉर्फ केलेले ते फोटो आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी जळगाव सायबर शाखेत अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५६, ३ (५) तसेच, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोरडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी नाशिकमध्येही भाजपने दखल घेतल्याचे समजते. नाशिकचे कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी भाजपतर्फे शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना संशयितांविरोधात कारवाईसाठी निवेदन देण्यात आल्याचे समजते. तर पंचवटीतील भाजपाच्या नगरसेविका प्रियंका माने यांनी म्हसरूळ पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली. यावेळी वरीष्ठ निरीक्षक सोहम माछरे यांनी याबाबत कारवाई सुरू असल्याचे सांगितल्यानंतर सदरचा अर्ज मागे घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.