Radhakrishna Vikhe Patil Helpline : अवैध धंद्यांवर कारवाईसाठी मंत्री विखेंची मोठी घोषणा! पोलिस क्रमांक असतानाही पुन्हा ‘स्पेशल हेल्पलाइन’चा धडाका, खबऱ्याचं नाव राहणार 'सीक्रेट'

Radhakrishna Vikhe Patil special helpline announcement : अहिल्यानगर कोपरगाव तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या आणि पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 64 निवासस्थानांच्या लोकार्पण कार्यक्रम झाला.
Radhakrishna Vikhe Patil Helpline
Radhakrishna Vikhe Patil HelplineSarkarnama
Published on
Updated on

Kopargaon police station inauguration : अहिल्यानगरमधील वाढती गुन्हेगारी राज्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ड्रग्स, अमली पदार्थांच्या तस्करीनं तर, या गुन्हेगारीला इंटरनॅशनल लेवलवर नेऊन ठेवलं आहे. हीच गुन्हेगारी मोडून काढण्याची भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वारंवार भाष्य करत आहे.

मंत्री विखे पाटील यांच्याबरोबर सत्तेतील आमदार देखील, तोच सूर अळवताना दिसतात. आता अहिल्यानगरमधील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष हेल्पलाइन कार्यान्वित करण्याची घोषणा पालकमंत्री विखे पाटील यांनी केली आहे. पोलिस दलाचे क्रमांक असताना, देखील पुन्हा नव्याने हेल्पलाईन जाहीर करण्याची मंत्री विखे पाटील यांची घोषणा कितपत यशस्वी ठरणार आता हा, आगामी काळाच ठरवेल.

कोपरगाव तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या आणि पोलिस (Police) अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 64 निवासस्थानांच्या लोकार्पण कार्यक्रम झाला. या वेळी पोलिस दलासाठी अत्याधुनिक चार फॉरेन्सिक लॅब व्हॅनचे लोकार्पण झालं. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, नगराध्यक्ष पराग संधान आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय मोडून काढण्याची आवश्यकता असून, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे. नागरिकांमधील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्यासाठी लवकरच एक विशेष 'हेल्पलाईन क्रमांक' कार्यान्वित करण्यात येईल." याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये नागरिकांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही आश्वासन जाहीरपणे मंत्री विखे पाटील यांनी दिले.

Radhakrishna Vikhe Patil Helpline
Sangamner Teacher Arrest : शाळेतच घडला संतापजनक प्रकार! शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, विद्यार्थिनी गर्भवती, आरोपीला ठोकल्या बेड्या

जिल्हा मुख्यालयात 322 निवासस्थानांचे काम

मंत्री विखे पाटील यांनी, राज्य सरकारच्या धोरणानुसार पोलिसांच्या कल्याणासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यात आली असून, जिल्हा मुख्यालयात 322 निवासस्थानांचे काम सुरू आहे. तसेच कोपरगाव (48) व पाथर्डी (54) इथल्या निवासस्थानांचे काम पूर्ण झाले असून, राहाता व शिर्डी येथे अद्ययावत पोलिस ठाण्यांच्या इमारती उभारण्यात आल्याचे सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil Helpline
Pratap Sarnaik announcement : 250 कोटी कमवायचेच…! परिवहन मंत्र्यांचा प्लॅन ठरला!

अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांची मागणी

'अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय व समृद्धी महामार्गांमुळे वाढणारी अंमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाचे मनुष्यबळ वाढवणे अत्यावश्यक आहे. याकरिता 500 अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांची मागणी सरकारकडे नोंदवण्यात आली आहे,' अशी माहिती देखील मंत्री विखे पाटील यांनी दिली.

सीसीटीव्हीचे जाळे विस्तारणार

गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळामार्फत सर्व महाविद्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून, ग्रामपंचायतींनीही लोकसहभागातून आपापल्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसवून 24 तास लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

'फॉरेन्सिक व्हॅन'

तसेच, गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा आणि न्यायदानात विलंब होऊ नये, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर अत्याधुनिक 'फॉरेन्सिक व्हॅन' उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याद्वारे घटनास्थळीच जलद तपासणी करणे शक्य होऊन तपासाला गती मिळेल, असा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com