Chhagan Bhujbal, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन छगन भुजबळ यांना घालणार लगाम? मतदारसंघातील अधिकाऱ्यांना दिला थेट इशारा!

MLA Kishor Darade Raises Complaint Against Yeola Officials : नाशिकच्या येवला मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमांना निमंत्रण दिले जात नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली.

Sampat Devgire

MLA Kishor Darade Raises Complaint Against Yeola Officials : नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटला. त्यामुळे रखडलेली जिल्हा नियोजन मंडळाची बैठक 28 महिन्यांनी आज झाली. या सभेत महायुतीच्या आमदारांनीच अन्यायाची तक्रार करीत दाद मागितली.

सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती या पार्श्वभूमीवर आज नियोजन मंडळाची बैठक झाली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने सजग राहून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश त्यांनी दिले.

आज झालेली जिल्हा नियोजन मंडळाची बैठक मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार किशोर दराडे यांनी यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्य सरकारवर केला तोच आरोप शिंदेंच्या आमदाराने महायुतीच्या मंत्र्यांवर केल्याने एकच खळबळ उडाली.

आमदार किशोर दराडे यांनी येवला मतदार संघात शासकीय निधीतून कामे होतात. या कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाला आपल्याला निमंत्रण दिले जात नाही. खासदारांनाही बोलावले जात नाही. ही लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा असल्याची तक्रार केली.

यासंदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही आपल्यावर अन्याय केला आहे. होणारी कामे सरकारी खर्चातून होतात. कोणाच्या खिशातून पैसे दिले जात नाहीत. मग आम्हाला निमंत्रण दिले जात नाही. हा मोठा हक्कभंग आहे. याबाबत कोण न्याय देणार? असा प्रश्न उपस्थित केला.

येवला मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांचा आहे. आमदार किशोर दराडे हे भुजबळांचे विरोधक आहेत. त्यांची तक्रार देखील छगन भुजबळ यांच्याबाबतच होती. विशेष म्हणजे त्यावेळी आमदार पंकज भुजबळ त्यांच्या शेजारीच बसलेले होते.

पालकमंत्री महाजन यांनी त्याची दखल घेतली. शासकीय कार्यक्रमांना आमदारांना निमंत्रण दिलेच पाहिजे. असे होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शासनाने देखील आपल्या सूचनेची दखल घेऊन तातडीने सुधारणा करावी, अशा सूचना महाजन यांनी यावेळी दिल्या.

तक्रार करणारे आमदार दराडे, ज्यांच्या विषयी तक्रार झाली ते मंत्री छगन भुजबळ आणि आदेश देणारे पालकमंत्री गिरीश महाजन हे तिघेही महायुती सरकारचे घटक आहेत. त्यांनीच याबाबत एकमेकांचे वाभाडे काढल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील खासदारांनी आपल्याला प्रशासनाकडून डावलले जाते अशी तक्रार केली होती. आता सत्ताधारी आमदारही विधिमंडळात हक्कभंग आणण्याचा इशारा देत असल्याने तो चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT