Girish Mahajan News : नागरिकांना स्वच्छता, कायदे आणि नियमांचे धडे देणाऱ्या शासकीय कार्यालयांची अवस्था कोणापासूनही लपून राहिलेली नाही. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या स्वतःच्या जामनेर मतदारसंघातील तहसीलदार कार्यालयही याला अपवाद ठरले नाही.
कार्यालयातील अस्वच्छता पाहून अखेर खुद्द मंत्री महाजन यांनीच हाती झाडू घेत साफसफाई करून कर्मचाऱ्यांना कृतिशील धडा दिला. दरम्यान, खुद्द मंत्र्यांनाच हाती झाडू घ्यावा लागल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली होती.
राज्यात 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह' सुरू असून बुधवारी त्याचा प्रारंभ झाला. या सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व आदिवासी बांधवांसाठीच्या योजनांची माहिती देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तहसीलदार कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
पत्रकारांशी संवाद साधतानाच कार्यालयातील अव्यवस्था आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रकार समोर आला. विशेषतः तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह कर्मचाऱ्यांच्याच तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी अक्षरशः उकिरडा बनले होते. कार्यालयाच्या भिंतींवरही जळमटे साचली होती.
हा प्रकार पाहून अस्वस्थ झालेल्या मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषद आटोपताच मंत्री महाजन यांनी स्वतःच झाडू हाती घेतला. त्यांनी कार्यालयाच्या भिंतीवरील जळमटे आणि परिसरातील अस्वच्छता स्वतः साफ केली. साफसफाई करत त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत धोंडे यांच्यासह आदिवासी विभागाचे अधिकारी आणि नायब तहसीलदार उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.