Girish Mahajan Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : साधू महंतांची नामी शक्कल; मंत्री गिरीश महाजनांना इच्छा नसतानाही प्यावं लागलं गोदावरी नदीचं पाणी, नेमकं प्रकरण काय?

Simhastha Kumbh Mela 2025 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी प्रदूषणचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिकांसह साधू मंतांनाही त्याची काळजी वाटते आहे. शासनाला त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे.

Sampat Devgire

Nashik News, 30 Mar : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी प्रदूषणचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिकांसह साधू मंतांनाही त्याची काळजी वाटते आहे. शासनाला त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे.

सिंहस्थ कुंभमेळा तयारी संदर्भात राज्य शासनाने साधू महंतांशी चर्चा सुरू केली आहे. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकतीच त्र्यंबकेश्वर येथे बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.

त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक साधू तसेच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे पदाधिकारी यावेळी अतिशय आक्रमक दिसून आले. सचिव महामंडलेश्वर हरी गिरी यांनी गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. यावेळी परिसराचा दौरा करताना त्यांनी गोदावरीचे पाणी पिण्यासाठी मंत्री महाजन यांना आग्रह केला.

मंत्री महाजन यांची मनापासून इच्छा नसली तरी हरी गिरी यांच्या आग्रहास्तव त्यांना गोदावरीचे पाणी प्यावे लागले. एवढेच नव्हे तर विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनाही हरी गिरी यांच्या आग्रहावरून आचमन करावे लागले. त्यानंतर या सगळ्यांनीच गोदावरी प्रदूषण मुक्तीचा विषय प्राधान्याचा असल्याचे मान्य केले.

मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळा तयारीची जबाबदारी स्वतःकडे घेतल्यासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पहिल्याच बैठकीत 1100 कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांआधीच घेतला होता.

त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेचे पदाधिकाऱ्यांकडून विविध सूचना सातत्याने केल्या जात आहेत. त्रंबकेश्वरला गोदावरीचा उगम होतो. मात्र येथील नदीपात्र अत्यंत अरुंद आणि लहान आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी केले जातात. त्यामुळे या प्रदूषणात भर पडत आहे. यापूर्वी उपाययोजना करूनही मनावर घेतले नसल्याने प्रदूषण वाढतच गेलेले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिकला गोदावरी नदीपात्रात रामकुंड येथे शाही स्नान होते. मात्र त्याआधी आणि नंतर गोदावरीचे प्रदूषण तीव्र बनले आहे. शहरातील विविध नाले थेट नदीत सोडण्यात आले आहेत. महापालिकेच्या मल्लनिसारण प्रकल्पाचे पाणी पूर्णतः प्रक्रिया न करताच नदीत सोडण्यात येत आहे. या समस्येने गोदावरी प्रदूषणमुक्त केव्हा होणार हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT