Manikrao Kokate : आधीच अजितदादांच्या वक्तव्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांनी दिला झटका; म्हणाले, "कर्जमाफीचं आश्वासन..."

Manikrao Kokate Statement : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाची रक्कम बँकेत भरावी. पुढच्या वर्षीही रक्कम भरावी.
Manikrao Kokate Ajit Pawar
Manikrao Kokate Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 30 Mar : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाची रक्कम बँकेत भरावी. पुढच्या वर्षीही रक्कम भरावी.

आधी जे सांगितले होते ते अंमलात येणार नाही. आम्हाला राज्यातील तेरा कोटी जनतेचा विचार करावा लागतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
Shiv Sena vs Kunal Kamra : 'टीका हा लोकशाहीचा आत्मा, हे मोदींचे म्हणणे शिंदेंना मान्य नाही का?' काँग्रेसच्या सपकाळांनी महायुतीला दाखवला आरसा

हे जुमला सरकार असून केवळ मतांसाठी आश्वासन दिली आणि आता दिलेला शब्द पाळत नसल्याची टीका विरोधत करत आहेत. अशातच आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, असे माझ्या कधी ऐकण्यात आलं नाही, असं कोकाटे यांनी म्हटंल आहे. त्यामुळे आधीच निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर कोकाटेंनी मीठ चोळलं आहे.

माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले?

माणिकराव कोकाटे म्हणाले, "राज्यातील 65 लाख शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. 31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार अर्थमंत्री पवार यांनी 2,555 कोटी रक्कम विमा कंपन्यांना वर्ग केली आहे.

Manikrao Kokate Ajit Pawar
PM Modi Nagpur Visit : PM मोदींच्या दौऱ्याआधी हिंदूंना एकीचा संदेश देणारे बॅनर्स; संघ अन् भाजपच्या मनात नेमकं काय? चर्चांना उधाण

ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही, यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं सांगतानाच त्यांनी कर्जमाफी करू, असं माझ्या कधी ऐकण्यात आलं नसल्याचं अजब वक्तव्य केलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com