Governer Bhagatsingh Koshiyari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कोश्‍यारी यांनी मराठी माणसाचा अवमान केला!

धुळे शहरातील फुलवाला चौकात राज्यपालांविरोधात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली.

Sampat Devgire

धुळे : राज्यपाल (Governer) भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी वादग्रस्त विधानातून मराठी (Maharashtra) माणसाचा अवमान केला. या निषेधार्थ युवा सेनेकडून (Yuve sena) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रदेश सहसचिव ॲड. पंकज गोरे )Pankaj Gore) यांनी दिली. (Yuve sena protest against Governer`s speech on Marathi people)

शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. राज्यपाल गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्य करीत असून, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या थोर प्रभृतींविषयी त्यांनी चुकीची वक्तव्ये केली आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी मराठी माणसाचा अवमान होईल असे वक्तव्य केले.

राज्यपाल सध्या सारवा सारव करीत असून चुक झाली असेल तर क्षमा मागतो, असे म्हणत आहेत. चुक झाली असेल तर या त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय होतो. ज्या मराठी माणसांच्या महाराष्ट्रात, मुंबईत रहायचे त्यांच्याच स्वाभिमानाला धक्का द्यायचा असे हे कृत्य आहे. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. त्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा यावेळी देण्यात आला.

राज्यपालांच्या निषेधार्थ युवा सेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवीत राज्यपालांना तत्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी सहसचिव ॲड. गोरे, जिल्हाप्रमुख संदीप मुळीक, युवती जिल्हाप्रमुख सोनी सोनार, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील, जिल्हा समन्वयक प्रियांका जोशी, साक्री तालुकाप्रमुख कामिनी देसले, शहरप्रमुख आकाश शिंदे, चिन्मयी सूर्यवंशी, उपशहरप्रमुख प्रेम सोनार, भूषण पाटील, सागर मोरे, भावेश अहिरराव, अमोल कानकाटे, उल्हास पाटील, राहुल इथापे, संदीप जोगी, कृष्णा पाटील, दर्शन कंबायत आदींनी केली.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT