तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी नार्वेकरांची नियुक्ती अन् मुंबईतील मंदिराचा मार्ग मोकळा

Milind Narvekar : भाविकांना दक्षिणेऐवजी आता नवी मुंबईतच व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.
Milind Narvekar
Milind NarvekarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : जगविख्यात तिरूमाला तिरूपती देवस्थानच्या विश्वस्त पदावर नियुक्ती होवून जेमतेम सात साडेसात महिने झाले असतानाच शिवसेनेचे (Shivsena) सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांनी (Milind narvekar) नवी मुंबईतील 10 एकर जागा देवस्थानच्या मंदिरासाठी मिळविली. ही जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे,(Uddhav Thackeray) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Adithya Thackeray) यांना पटवून नार्वेकरांनी या जागेच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटवून घेतली.

Milind Narvekar
वळसे पाटलांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या, दिले भाजपचे उदाहरण...

त्यामुळे या जागेला आता व्यंकेटेश्वराचे भव्य मंदीर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाविकांना दक्षिणेऐवजी नवी मुंबईतच व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे देवस्थान समितीवरील विश्वस्त पदाचा मान यंदा नार्वेकरांना मिळाला आहे. या पदासाठी सप्टेंबर महिन्यात नार्वेकरांची निवड झाली. त्यानंतर लगेचच मुंबईतच देवस्थानासाठी मुंबईत जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. त्यापाठोपाठ नार्वेकर यांनी समितीचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील उलवे येथील जागेची पाहणी घेतली आणि मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली.

त्यानुसार गेल्या महिन्यात सिडकोतर्फे संचालक मंडळाच्या बैठकीत देवस्थानला जागा देण्याचा निर्णय घेत त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याची सूचना मंत्री शिंदे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. हा प्रस्ताव रखडणार नाही याकडे विशेष लक्ष देऊन आदित्य ठाकरेंनी तो प्रस्ताव मंजूर करून घेतला. दरम्यान पुढील वर्षभरात टप्याटप्प्याने या जागेचा ताबा देवस्थान समितीला मिळणार आहे.

Milind Narvekar
मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षणासाठी भुजबळ, पटोलेंचा नकार

मागील फडणवीस सरकारच्या काळात याच देवस्थानला बीकेसीतील ऐन कोट्यावधी रूपयांचा भूखंड हवा होता. त्यावेळी तत्काली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नीला देवस्थान समितीच्या विश्वस्त समितीवर स्थान देण्यात आले. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यासाठी या जमिनीसाठी नाममात्र एक रूपये इतके भाडे आकारण्यात आले. पूर्वी या जागेवर तिरूपती बालाजीचे मंदिर आणि तिरूपती येथील मंदिरासाठी ऑनलाईन रिजर्व्हेशन सुविधा करून देण्यात येणार होती.

मात्र आता बीकेसीतील जागेवर फक्त तिरूपती तिरूमला येथे जाणाऱ्या भाविकांचे आरक्षण होणार आहे. तर त्या मंदिराचे प्रतिकृती नवी मुंबई येथे देण्यात येणाऱ्या 10 एकर जागेवर उभारण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com