Uday Samant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uday Samant Politics: सरकारी अधिकाऱ्यांनीच मारली मंत्र्यांच्या बैठकीला दांडी, नाशिकमध्ये उदय सामंतांचा पारा चढला

Uday Samant Meeting : मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. नाशिक येथे होणाऱ्या मराठी भाषा संमेलनाच्या तयारीसाठी त्यांचा हा दौरा होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

Sampat Devgire

Nashik News: केंद्र सरकारकडून महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील सरकारी कार्यालयं,शाळा यांसह प्रमुख सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेचा वापर बंधनकारक केला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिजन वर्गात मराठी भाषेविषयी अभिमान वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच नाशिकमध्ये सरकारी बाबूंना मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे आढळून आले आहे.

मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत (Uday Samant) नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. नाशिक येथे होणाऱ्या मराठी भाषा संमेलनाच्या तयारीसाठी त्यांचा हा दौरा होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र,या बैठकीला खुद्द महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

मंत्री उदय सामंत यांनी बैठक सुरू झाल्यावर येथे मराठी भाषा अधिकारी कोण? असा प्रश्न केला. त्यावर उपस्थितांमध्ये एकमेकांकडे पाहत खांदे उडवण्यात आले. मंत्री उदय सामंत यांना हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे त्यांची चिडचिड सुरू झाली.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेले या बैठकीत महसूल विभागाचे अधिकारीच गायब होते. पुरवठा अधिकारी गणेश जाधव वगळता अन्य कोणीही अधिकारी नव्हते. त्यामुळे मराठी भाषा अधिकारी कोण याची शोधा शोध सुरू झाली. अन बैठकीतच हा प्रश्न निघाल्याने उपस्थितांमध्ये देखील चुळबूळ सुरू झाली.

केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. साहित्य आणि अभिजन वर्गात त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले होते. विश्व मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून उदय सामंत यांनी राज्यभरात भाषेचा प्रसार व्हावा म्हणून विविध उपक्रमांचा आढावा घेतला होता.

विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे त्याचाच एक भाग आहे. पुणे आणि मुंबई येथे यापूर्वी हे संमेलन झाले आहे. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान नाशिक (Nashik) येथे विश्व मराठी संमेलन होणार आहे.

एक मोठा उपक्रम असल्याने त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री सामंत आले होते. त्यात या संमेलनाच्या तयारीबाबत प्रशासकीय स्तरावर फारशी हालचाल दिसून आली नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी कोण याचाच कोणालाही थांगपत्ता नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT