Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सरकारी योजना कागदावर नको, प्रत्यक्षात राबवा!

Sampat Devgire

तळोदा : आदिवासी समाजाचे (Trible Community) दैवत बिरसा मुंडा (Birsa Munda) यांनी ब्रिटिश शासनाच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला. आदिवासी जनतेच्या हितासाठी केंद्र (Centre) व राज्य शासन (Maharashtra Government) विविध योजना राबवीत आहे. मात्र या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. योजना कागदावर न राहता, प्रत्यक्षात राबविण्यात याव्यात, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले. (Girish Mahajan instructs administration for trible development schemes)

जनजाती गौरव दिनानिमित्त तळोद्यात बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंगळवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.

मंत्री महाजन पुढे म्हणाले, की गोरगरिबांसाठी शासन घरकुल, शबरी, हर घर नळ योजना, उज्ज्वला योजना अशा विविध योजना राबवीत असून, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. आमदार राजेश पाडवी म्हणाले, की शहराच्या सौंदर्यात गेल्या काळात भर पडली असून, या काळात रस्त्यांची, स्मारकाची कामे करीत त्यांचे नामकरण करण्यात आले. खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले, की आजचा दिवस आदिवासी समाजासाठी महत्त्वाचा आहे. बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आल्याबद्दल त्यांनी तळोदा पालिकेचे अभिनंदन केले. या वेळी आदिवासी बांधव व महिलांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर, पारंपरिक दागदागिने घालत आदिवासी नृत्य केले.

डॉ. शशिकांत वाणी व अविनाश मराठे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, गुड्डू वळवी, किरण सूर्यवंशी, हेमराज पवार, ॲड. जयस्वाल, गोपी पावरा, चेतन शर्मा आदींसह जय आदिवासी युवा शक्तीचे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

क्रीडासंकुलाचा मार्ग मोकळा

तळोद्यातील खेळाडूंना फायदा व्हावा यासाठी येथील क्रीडासंकुलाच्या डागडुजीसाठी व मैदानावरील विविध कामांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी या वेळी दिले. त्यामुळे लोकार्पण होऊन जवळपास पाच वर्षे खेळाडूंसाठी बंद असलेल्या संकुलाच्या मार्गातील अडथळे दूर होत ते खेळाडूंसाठी खुले होण्याची शक्यता बळावली आहे.

यावेळी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, प्रदेश सदस्य दीपक पाटील, लोकसभा प्रभारी राजेंद्र गावित, शहराध्यक्ष योगेश चौधरी, आदिवासी युवाशक्तीचे अध्यक्ष विनोद माळी, युवा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT