Chhagan Bhujbal with Farmers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: शेतीचे पंचनामे तातडीने करा, भरीव मदत द्या!

येवला मतदारसंघात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ.

Sampat Devgire

येवला : तालुक्यातील (Yeola) पाटोदा, शिरसगाव लौकी, मुखेडसह काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस (Heavy Rain) झाल्याने सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे रस्ते उध्वस्त झाले, शाळेच्या इमारती तसेच घरांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाने (Government) तातडीने भरीव अशी मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. (farmers in serious damages of crop due to heavy rain)

श्री. भुजबळ यांनी आज मुखेड, शिरसगाव व पाटोदा परिसरातील अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, कृषी अधिकारी श्री.देशपांडे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, माजी सभापती संजय बनकर, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वसंत पवार, शिवसेना तालूकाप्रमुख रतन बोरनारे, ज्येष्ठ नेते राधाकिसन सोनवणे, विश्वास आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, बाळासाहेब गुंड, देविदास शेळके, अशोक मेंगाने, प्रकाश वाघ, गणपत कांदळकर, डॉ. प्रवीण बुल्हे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील विविध भागात जात भुजबळ यांनी पिकात साचलेले पाणी तसेच त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत सविस्तर माहिती घेतली.

श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून आपण जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याबाबत चर्चा केली आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात देखील नुकसानग्रस्तांना अधिक मदत तातडीने मिळण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुखेड परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. भुजबळ यांनी तातडीने पिंजरा लावण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

अशी झाली अतिवृष्टीमुळे हानी

अतिवृष्टीमुळे १२ गावांमधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही शेतात प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे. पावसामुळे रस्त्यांची देखील वाट लागली असून अनेक ठिकाणी घरांची तसेच शाळेच्या खोल्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी देखील भरीव निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

सिंगल फेज योजना व्यवस्थि राबवा

तालुक्यातील मुखेड, शिरसगाव, पाटोदा परिसरात १२ गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागाची भुजबळ यांनी पाहणी करत प्रशासनाने तातडीने सर्व पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. पावसामुळे अनेक भागात विजेचे प्रश्न निर्माण झाल्याने तातडीने हा प्रश्न सोडवून विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. सिंगल फेज यंत्रणा व्यवस्थित रित्या राबविण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गोदावरी तट कलव्यावरील मुखेड कॅनाल चारीची २० किलोमिटर अंतरावरील वहन क्षमता वाढविण्यासाठी अधिक पाईपची व्यवस्था करण्यात येऊन तातडीने हे काम करण्यात येऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने चाऱ्या करून देण्यात याव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT