Minister Hassan Mushrif

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

हसन मुश्रीफांचा विश्वास, महिलांच्या कौशल्यपूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करू

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले.

Sampat Devgire

नाशिक : जिल्हा परिषदेंतर्गत रिक्त पदांचा अनुशेष तत्काळ भरावा, तसेच जिल्ह्यातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. याबाबत राज्य शासन नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushriff) यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते.

श्री. मुश्रीफ म्हणाले, की विविध विकास योजनांसाठी उपलब्ध निधीचा खर्च, तसेच जिल्ह्यातील घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. त्यासोबतच स्मशानभूमी, शाळा व अंगणवाडी यांच्या बांधकामावर विशेष भर देण्यात यावा. पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन लाभार्थी योजनेंतर्गत भूमिहीनांना सरकारी, गायरान आणि महामंडळाच्या जमिनीतून जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

सकारात्मक निर्णयाची ग्वाही

ग्रामपंचायत विभागाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन जाणून घेत २०२०-२१, २०२१-२२ च्या जिल्हा नियोजनातील उत्कृष्ट कामकाज व २११ अनुकंपापदांची भरती, मुख्याध्यापक पदोन्नती आणि सर्व सेवाज्येष्ठता याद्यांच्या प्रारूप यादी १ जानेवारीला प्रसिद्ध करणे, जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी राबविलेल्या ‘एक मूठ पोषण’ या कामांचे श्री. मुश्रीफ यांनी कौतुक केले. तसेच लघुपाटबंधारे विभागाच्या ग्रामीण भागातील पाझर तलावांचे काम जिल्हा परिषदेतर्फे करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT