BJP meeting News : ''नाशिक ही भूमी निवृत्तीनाथाची भूमी आहे. भाजपने याच भूमीत 'शत-प्रतिशत'चा नारा दिला होता तीच ही भूमी आहे. आपण दिलेल्या नाऱ्यामुळे महाराष्ट्रात पहिला पक्ष भाजप आहे हे आपण दाखवून दिलं.
मला काय मिळणार हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत सोडून द्या. पदे मिळतील पदे मिळणार नाहीत. पण सध्या काम करा. त्यानंतर जनता आपल्याला पुन्हा एकदा संधी देईल'', असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.
''मागील अडीच वर्ष महाराष्ट्राचे वाया गेले. अडीच वर्ष मागच्या सरकारमध्ये काहींनी घरं भरण्याचे कामं केले. मात्र, आता जनतेचे सरकार आहे. आम्ही आता 20-20 ची बॅटिंग सुरू केली आहे आणि ही बॅटिंग 2024 सालीही दिसेल'', असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू होती. आज या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले, ''आपण जे केलं ते नियमाने आणि कायद्याने केलं आहे. पण ते म्हणतात की हे सरकार आत्ता पडेल मग पडेल. मात्र हे सरकार पडणार नाही. त्यांना वाटतं कायदा त्यांनाच कळतो. मात्र, कायदा आम्हालाही कळतो. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलच. तसेच पुन्हा देखील हेच सरकार सत्तेत येईल.''
''देशाच्या ज्या सर्वोच्च संस्था आहेत. त्यांच्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करण्याचे काम करत आहेत. मागचे सरकार मला जेलमध्ये टाकण्यासाठी झटत होतं. मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी त्यांनी ज्यांना दिली तेच जेलमध्ये गेले. पण मला ते जेलमध्ये टाकू शकले नाहीत'', असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
दरम्यान, भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये सुरू होती. आज या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.