Narayan Rane on Shivsena : नारायण राणेंचं 'धनुष्या'वर भविष्य; म्हणाले "हे चिन्ह तर..."

By poll Election : पोटनिवडणुकीत मताधिक्याने निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

Shivsena Symbol : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने पक्षासह धनुष्यबाण या चिन्हावरही दावा सांगितला. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. आता या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारणा केली. यावर त्यांनी ज्योतिष सांगतो असे म्हणून थेटच भविष्य वर्तविलं.

नारायण राणे (Narayan Rane) पुण्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत, विनायक राऊत, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली. मूळ शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही वक्तव्य केलं.

यावेळी राणे यांना वारीसे मृत्यूप्रकरणातील आरोपीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या फलकावर फोटो होते, असे विचारले. त्यावरही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, "आजकाल कुणीही फोटो लावतो. शिवसेनावाले तर वडिलांचाही फोटो लावत नाहीत. ते विसरले वडिलांना."

Narayan Rane
Narayan Rane : पत्रकाराच्या मृत्यूवर नारायण राणे म्हणतात, "मी काय तेवढंच बघू का..?

मुलाच्या नामकरणाचा वडिलांना अधिकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. यावर राणे म्हणाले, "आम्ही विकास केलाय. मुलांना जन्म घातल्यावर नाव द्यायचा अधिकार वडिलांना असतो. काल वंदे भारतच्या गाड्या सोडल्या. त्यासाठी पंतप्रधानांना बोलावलं. ते पैसे देतात. त्यात चुकीचं काय आहे."

यानंतर राणे यांनी ठाकरे यांना निशाणा बनविलं. ते म्हणाले, "शिवसेनेने काय केलं अडीच वर्षात. मातोश्री सोडली नाही. अडीच वर्षात मंत्रालयात अडीच तास बसले. असा कुठं मुख्यमंत्री असतो का?"

Narayan Rane
Ravikant Tupkar : आत्मदहन प्रयत्नानंतर आता पोलिस स्थानकातून तुपकरांचा अन्नत्याग : आंदोलनावर ठामच!

विरोधकांची धूळधाण

चिंचवड आणि कसब्यातील निवडणुकांवर (By Poll Election) राणे म्हणाले की, या निवडणुकीतील दोन्ही जागा मताधिक्याने जिंकणार आहे. विरोधक धुराळ्यासारखे उडतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्याचा दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत.

राणे म्हणाले की, आम्ही ग्रामपंचायत ते लोकसभा सर्व निवडणुका गांभिर्याने घेत असल्याचे सांगितले. तर कसब्यातील नाराज ब्राम्हण समाजावर बोलणे टाळून आमची अडचण करू नका असाही विधान त्यांनी केले. यावेळी त्यांच्याबरोबर कोथरूच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनीही त्यांच्या या विधानाला दुजोरा दिला.

Narayan Rane
Pankaja Munday News : पंकजांची नाराजी दूर? फडणवीस-मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास...

अजित पवारांना प्रक्रिया माहीत

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांनी नऊ महिन्यात मूल होते, यांचा मंत्रीमंडळ विस्तार होत नाही, अशी टीका केली आहे. त्याचा राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांना चांगली माहिती आहे. त्यांना बोलता येते, त्यांनी मंत्री असताना काय केलं, याची चौकशी सुरू आहे."

धनुष्यबाणावर भविष्य

शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावर आता सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यावर नारायण राणे म्हणाले, "मी ज्योतीष सांगू का. मला असं वाटतं उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी-धनुष्यबाणासाठी भांडतायत ते चिन्हं जाईल, एकनाथ शिंदेना मिळेल."

Narayan Rane
Anil Deshmukh News : अनिल देशमुखांचे होम ग्राऊंडवर तब्बल 21 महिन्यांनी पाऊल; नागपुरात जाताच झाले भावूक

ते तर माझे मित्र

काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वादावर राणे म्हणाले की, बाळासाहेब थोरातांची नाराजी जात असेल तर मी जातो. ते माझे मित्र आहे. ज्येष्ठ नेते आहेत. अशा वेळी मी संपर्क करीत नाही. ते स्वतःच्या बुद्धीला पटेल असाच निर्णय घेतील. तसेच नाना पटोले (Nana Patole) आणि कार्यक्षमता याचा काही संबंध नसल्याचीही टीका त्यांनी केली.

यानंतर त्यांनी भाजपमधील वादावर भाष्य केले. राणे म्हणाले की, "आम्ही बऱ्याच गोष्टीपासून बोध घेतो. भाजप (BJP) असा पक्ष आहे दिवसेंदिवस आत्मपरिक्षण आणि सुधारणाही करतो. जर कुणावर अन्याय झाला असेल तर पक्ष बघून घेईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com