Ram Shinde and Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election Results: राजकारण तापलं; राम शिंदे अन् रोहित पवार गटाकडून विजयी सरपंचांवर दावा

Ganesh Thombare

प्रदीप पेंढारे :

Ahmednagar News: कर्जत तालुक्यात सरपंच पळवापळवीला सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार गटाकडून निवडून आलेल्या सरपंचांवर दावे सांगण्यात सुरुवात झाली आहे.

दोन्ही आमदारांच्या गटाकडून सरपंच आपल्याच गटाचे असल्याचा दावा केला जात असल्यामुळे कोण-कोणाच्या गटाचा हा संभ्रम निर्माण झाला आहे, असे असले तरी कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निकालात चार ग्रामपंचायतींवर भाजपचाच वरचष्मा राहिला आहे.

कर्जतमधील चार ग्रामपंचायतींवर भाजप गटाने वर्चस्व स्थापित केल्याने आमदार राम शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याचे दिसते आहे. औटेवाडी ग्रामपंचायत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे आणि गणेशवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे समर्थकांनी सांगितले.

सहा ग्रामपंचायतींच्या निकालात भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार गटाला धोबीपछाड दिले. या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्ताधारी गटाला फटका बसला आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्व असलेल्या कुंभेफळ ग्रामपंचायतीवर धुमाळ गटाने तर खेडमध्ये मोरे यांनी सरपंचपदासह सत्ता काबीज केली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्जत तालुक्यातील कुंभेफळ, खेड, करमणवाडी, वायसेवाडी, गणेशवाडी आणि औटेवाडी ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरासरी 91 टक्के मतदान पार पडले होते. सोमवारी, सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणी झाली. सहा ग्रामपंचायतींपैकी कुंभेफळ, खेड, वायसेवाडी आणि करमणवाडी या चार ग्रामपंचायतींवर भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दावा केला आहे.

तर औटेवाडी ग्रामपंचायतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने बिनविरोध करण्यात यश मिळवले होते. गणेशवाडी ग्रामपंचायत आमदार रोहित पवार गटाकडे राखण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीच्या सुनील शेलार यांनी निवडून आलेल्या सरपंच पदावरील व्यक्तीने आपला पक्ष सांगितल्यावरच विरोधकांनी दावा करावा, अशी प्रतिक्रिया दिली. निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांनी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराजांचे वाजत-गाजत मिरवणुकीने दर्शन घेतले.

ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार :

कुंभेफळ : प्रियंका संतोष धुमाळ 1045 (विजयी) सरपंच. विजयी सदस्य : जहीर इंनुस शेख 274, आश्विनी भाऊसाहेब धोदाड 324, मिनल रणजीत धोदाड 266, अनिल वसंत कवडे 372, श्रीराम दशरथ दळवी 364, कृष्णाबाई हनुमंत नेटके 322, ऋषीकेश बाप्पासाहेब धांडे 421, प्रेमा आण्णा धांडे 442, आणि दीपाली अनिल सावंत 440.

खेड : अमित विलासराव मोरे 1336 (विजयी) सरपंच, विजयी सदस्य : चंद्रकांत मोरे 375, शारदा दत्तू खंडागळे 402, उज्वला चौरंग मोरे 388, हनुमंत रणवरे 273, जयश्री सत्यवान शेटे 262, उज्ज्वला महादेव वाघमारे 287, मोहन शेटे 337, स्वाती अनिल काकडे 336, उमाकांत नलगे 361, सुनील गायकवाड 336, मीना अनिल आगवन 332.

गणेशवाडी : गणेश दादासाहेब पाडुळे 1329 (विजयी) सरपंच, विजयी सदस्य : गणपत कायगुडे 411, सुनीता राजेंद्र खताळ 460, तेजल संतोष दातीर 405, शंकर ठोबरे 382, सुजाता संतोष कायगुडे 408, सुरेखा सुनील मदने 362, दत्तात्रय कारंडे 391, विकी बारटक्के 431, विमल संजय दातीर 385.

वायसेवाडी : मनेश पोपट हिरनवळे 575 (विजयी) सरपंच. विजयी सदस्य : महादेव कायगुडे 239, मनीषा दत्तात्रय पवळ 216, मोनाली मल्हारी सुळ 198, अशोक पवळ 132, अनिता दादा अर्जुन 129, भीमा हिरणवळे 214, छाया नवनाथ भिसे 218.

करमणवाडी : फुलाबाई किसन पुणेकर 552 (विजयी) सरपंच. विजयी सदस्य : नितीन पावणे 242, रेखा नितीन पवार 237, ताईबाई प्रकाश मेहेर 200, अमोल सायकर 209, सोनाबाई अंकुश पुणेकर 187, नितीन खराडे 202, रेखा भरत बनसोडे 184.

औटेवाडी : शशिकला महादेव मोरे (बिनविरोध) विजयी सदस्य : देविदास आबासाहेब महाडिक, अर्चना यादव कापसे, मनीषा संदीप कापसे, महेंद्र ज्ञानदेव ढमे, लताबाई नवनाथ पवार, सुजाता जनार्दन मुरकुटे (वरील सर्व बिनविरोध) तर उर्वरित एका जागेसाठी राहुल ढवाण 104 मते मिळवत विजय संपादन केला. यासह दोन पोटनिवडणुकीच्या दुधोडी ग्रामपंचायतीमध्ये अर्चना सचिन जांभळे 274, तर ताजू ग्रामपंचायतीमध्ये राजश्री निखिल बनसोडे 274 यांनी विजय मिळवला.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT