Gram Panchayat Election Results : मावळचा सरदार कोण? निवडणूक निकालावरून भाजप आणि अजित पवार गटात जुंपली!

Maharashtra Gram Panchayat Election Maval Taluka Results : राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि अजित पवार गटाने ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावरून मावळमध्ये दावे-प्रतिदावे केले आहेत...
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झालं. त्याचा निकाल आज आला. ही निवडणूक चिन्हावर होत नसूनही सर्वाधिक ग्रामपंचायती आपणच जिंकल्याचा दावा राजकीय पक्षांकडून केला गेला आहे. त्याला मावळ तालुका (जि.पुणे) तरी कसा अपवाद असेल. तेथील १९ पैकी १० ग्रामपंचायतींचे सरपंच आपले झाल्याचा दावा भाजपने ठोकला आहे, तर ऐंशी टक्के सरपंच आपलेच निवडून आल्याचा प्रतिदावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार गट) केला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Gram Panchayat Election Results : "...म्हणून शरद पवार गटाची ही अवस्था", मुश्रीफांनी ग्रामपंचायत निकालावरून लगावले टोले

मावळातील १९ ग्रामंचायतींची निवडणूक झाली. त्यातील चार बिनविरोध झाल्या. त्यातील एकेक सरपंच आपला निवडून आल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीने अगोदरच केला होता. त्यामुळे रविवारी १५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यात नऊ सरपंच आपले झाल्याचा दावा भाजपचे माजी मंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे आणि भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी काही वेळापूर्वी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

तर, ऐंशी टक्के सरपंच आपले झाल्याचा प्रतिदावा राष्ट्रवादीचे (अजित पवार) मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केला. रवींद्र भेगडे यांनी आपले सरपंच झालेल्या गावांची व तेथील सरपंचांच्या नावांची यादी दिली. तशी राष्ट्रवादीकडूनही देण्यात आली. भाजपने आपल्या नवनिर्वाचित सरपंचांचा लगेच सत्कारही केला.

मावळ तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही निवडणूक ठरली आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर बाळा भेगडेंनी दिली, तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाचा हा विजय असल्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष खांडगे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला निधी आणि गावपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कष्टाचे हे फळ असून, हा विजय गावाच्या विकासासाठी समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणूक झालेल्या १५ पैकी १० सरपंच आपले, तर पाच भाजपचे निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Gram Panchayat Election Result 2023 : कऱ्हाड उत्तरेत बाळासाहेब पाटलांचे वर्चस्व; आठ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com