Jayant Patil with palve family Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मुंबईच्या ग्रॅंटरोडच्या चौकाला येवल्याच्या कारभारीशेठ पालवेंचे नाव!

कारभारीशेठ पालवे चौकाचे जयंत पाटलांच्या हस्ते झाले उद्‌घाटन

Sampat Devgire

येवला : व्यक्तीचे कार्यकर्तृत्व असले की त्याची दखल होतेच. तालुक्यातील पिंपळखुंटे तिसरे येथील भूमिपुत्र व प्रगतिशील शेतकरी (स्व.) कारभारीशेठ पालवे यांच्या कार्याची दखल घेऊन मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या ग्रँड रोडवरील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या निमित्ताने येवल्याचा मुंबईत सन्मान झाला आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे नामकरण झाले. पिंपळखुंटे तिसरे म्हणजे पोलिस अधिकारी आणि पोलिसांचे गाव..आजही अर्ध्या गावातील तरुण मुंबईत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. संतोष पालवे व सुनील पालवे हे व्यवसायानिमित्ताने ग्रॅड रोड भागात नावलौकिक करून आहेत.

सुनील पालवे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या कुटुंबीयांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन ग्रँड रोड वरील अलिभाई प्रेमजी मार्ग व उरणवाला स्ट्रीट (स्टेशन जवळ) येथील चौकाला समाजसेवक कारभारी विठ्ठल पालवे चौक असे नाव देण्यात आले आहे. या नामफलकाचे मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सुशीला पालवे, सुनील पालवे, संतोष पालवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अशोक धात्रक, राष्ट्रवादीचे मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, नगरसेवक राजेंद्र नरवणकर, दक्षिण मुंबई अध्यक्ष विजय वाडकर, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे माजी विश्वस्त नितीन कदम, विश्वस्त सुनील गिरी, राजाराम देशमुख, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, नाशिकच्या व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, गुरुदेव कांदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील यांनी पालवे यांच्या सामाजिक कामाचे कौतुक करीत ग्रँड रोड भागातील चौकाला या नामकरणामुळे नवी ओळख मिळाल्याचे म्हणाले. जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

...

‘ग्रँड रोड भागात केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन आमच्या वडिलांचे नाव चौकाला देण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. आमच्या कुटुंबीयांसह येवला व पिंपळखुंटे करासाठी हा क्षण नक्कीच आनंदाचा ठरला आहे.’

- सुनील पालवे, विश्वस्त, सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT