भूखंड वाचविण्यासाठी भाजपकडून फसवणूकीचे षडयंत्र

विकासकामांना विरोधासाठी भाजपने षडयंत्र रचल्याचा उपमहापौर नीलेश आहेर यांचा आरोप
Dy Mayor Nilesh Aher with Shivsena leaders
Dy Mayor Nilesh Aher with Shivsena leadersSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : आम्ही महापालिकेचा (Malegaon) ठराव शासन विखंडितच करणार आहे. मात्र भाजपचा (BJP) आपल्या नेत्याच्या संस्थेची जागा वाचविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. विकासकामांना विरोधासाठी मैदान वाचविण्याच्या नावाने षडयंत्र रचले जात आहे. भाजप मालेगाव शहरवासीयांची फसवणूक करीत आहे, असा आरोप उपमहापौर नीलेश आहेर (Dy Mayor Nilesh Aher) यांनी केला.

Dy Mayor Nilesh Aher with Shivsena leaders
मधमाशीच्या दंशाने एकनाथ खडसेंची गुडघेदुखी संपली!

शिवसेनेतर्फे शासकीय विश्रामगृहावर श्री. आहेर, उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, महानगरप्रमुख राजाराम जाधव, युवासेनेचे विनोद वाघ यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, शहरातील महाविद्यालय व पोलिस कवायत मैदानप्रश्‍नी भाजपकडून शहरवसीयांची दिशाभूल केली जात आहे. शहरवासीयांच्या हिताचे सव्वा कोटींचे जॉगिंग ट्रॅकचे काम होऊ द्यायचे नाही हा त्यामागील हेतू आहे.

Dy Mayor Nilesh Aher with Shivsena leaders
रमेश पवार नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त; कैलास जाधव होल्डवर!

ते म्हणाले, की महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेशी झालेला ठराव रद्द करून हे दोन्ही मैदान शासनाच्या मालकीचे व्हावेत. शहरवासीयांच्या हितासाठीच ही जमीन असावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. महासभेतील ठरावाला स्पष्टपणे विरोधही केला आहे. हा ठराव विखंडित करण्याबरोबरच विद्यामंदीर संस्थेच्या ताब्यातील जागा शासनाने घ्यावी. करारनामा रद्द करावा, अशी मागणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेटून केली आहे.

महासभेत लष्कर ईदगाह ट्रस्टला जागा देण्याचा झालेला ठराव रद्द करण्याचे स्पष्ट आश्‍वासन श्री. शिंदे यांनी दिले आहे. मुळात शासनाच्या जागेचा ठराव करण्याचा महासभेला अधिकार नाही. महात्मा गांधी विद्यामंदिरचा १९७१ मध्ये करार झालेला आहे. हा करारही रद्द करण्याची आम्ही मागणी केली आहे. भाजपने याप्रश्‍नी भूमिका स्पष्ट करावी. विद्यामंदिरने मैदान ताब्यात असताना अटी-शर्तींप्रमाणे खेळाडूंच्या हितासाठी कुठल्याही सुविधा का पुरविल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

याउलट कृषिमंत्री दादा भुसे यांनी सव्वा कोटीच्या जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू केले, त्यावेळी शहर व तालुक्याने त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. श्री. भुसे यांच्या पुढाकाराने पाच सुसज्ज हॉस्पिटल होत आहेत. पाच कृषी महाविद्यालयांची निर्मिती झाली आहे. ८६३ एकर जमिनीवर औद्योगिक वसाहत आकाराला येत आहे. कॉलेज व पोलिस कवायत मैदान तसेच बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल असे दोन जॉगिंग ट्रॅक होत आहेत. कॅम्प चर्च ते टेहरे चौफुली या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण होत आहे. ही सर्व विकासकामे विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. यामुळे पूर्व भागातील नेत्यांना हाताशी धरून भाजपने सुरू केलेला डाव शहरवासीयांनी ओळखावा. भाजपकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नाही.

कोरोनाकाळात गायब असलेल्या त्यांच्या नेत्यांना आता जनतेचा पुळका सुटला आहे. महापालिकेत भाजप सत्तारुढ गटासोबतच आहे. भाजपच्या सुवर्णा शेलार सभापतीही झाल्या. मला स्वत: व ताहेरा शेख यांनाही त्यांनी मतदान केले. यामुळे मनपातील सर्व नगरसेवकांना निधीचे समसमान वाटप झाले आहे. प्रमोद पाटील, संजय घोडके आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com