Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पालकमंत्री अब्दुल सत्तार नियोजन समितीत भाजपवर अन्याय केला?

Sampat Devgire

धुळे : यंदाचे आर्थिक वर्ष सरत असताना, जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या शिफारशीने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) १३ सदस्यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाली. त्यात आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित यांचीही निवड झाली. मात्र यामध्ये बहुतांश संस्थांत सत्तेत असतानाही भाजपला (BJP) डावलल्याची तक्रार करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेले सदस्य असे ः नामनिर्देशीत- महेश मिस्त्री (शिवसेना), रणजित भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस), विशेष निमंत्रित- डॉ. तुळशीराम गावित, बाळासाहेब भदाणे, हेमंत साळुंखे, डॉ. भरत राजपूत, रऊफ खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस- किरण पाटील, डॉ. जितेंद्र ठाकूर, सुरेश सोनवणे, काँग्रेस- श्‍यामकांत सनेर, युवराज करनकाळ, डॉ. संदीप पाटील. यात मांडळच्या (ता. धुळे) सरपंच नयना पाटील यांचे पती आणि देवपूरमधील इंदिरा गार्डन परिसरातील साडेतीनशेवर सक्रिय तरुणांच्या वंदे मातरम्‌ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर प्रथमच निवड झाली. त्यांच्या नावाची आमदार कुणाल पाटील यांनी शिफारस केली.

भाजपची नाराजी

जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्य वगळता जिल्हा परिषद व पालिका क्षेत्रातील मिळून एकूण सरासरी २७ सदस्य निवडून यावे लागतात. त्यासाठी निवडणूक होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदार असतात.

येथे ही निवडणूक अद्याप झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिकेतील भाजप सदस्य नाराज झाले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील यांनी निवडणुकीअभावी परिषदेच्या २२ सदस्यांना डावलल्याने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे डावलले जात आहे. महापालिकेबाबत हीच स्थिती आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करीत असल्याचे सभापती पाटील यांनी म्हटले आहे. भाजप सरकारच्या काळात ही निवडणूक झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडणूक घेतली जात नसल्याचे गोटातून सांगण्यात येते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT