Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik news; मुलींसाठी होणार सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था

महाराष्ट्र शासनामार्फत सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

Sampat Devgire

मालेगाव : (Malegaon) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये मुलींना (Womens) प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र शासनाने (Government of India) सन २०२१ मध्ये घेतला. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी भारतातील पहिली शासकीय मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था नाशिक (Nashik) येथे मंजूर झाली आहे. (Government sanctions a girls army training school for Nashik)

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा, या हेतुने महाराष्ट्र शासनामार्फत १९७७ मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठी सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था स्थापन करण्यात आले. त्यानंतर नाशिकला अशी संस्था होत आहे. त्यामुळे या निर्णयाला महत्त्व आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार पुणे येथील प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत-जास्त मुलींचा प्रवेश व्हावा या हेतुने नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था व्हावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास नागपूर हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

एनडीए संस्थेत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असावे. यासाठी नाशिक येथे जून २०२३ पासून शासकीय मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहे. या संस्थेत प्रथम वर्षासाठी ३० व द्वितीय वर्षासाठी ३० विद्यार्थिनींना प्रवेशासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था माजी सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृहात करण्यात येणार असून पोलिस ॲकॅडमी केंद्र येथे मुलींना सैनिकी पूर्व शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी, कर्मचारी पदांना राज्य शासनाने मान्यता दिल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कळविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT