Abdul Sattar Latest News : हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्वाधिक निशाण्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार राहिले. गायरान घोटाळा, कृषी महोत्सवाच्या वसूली टार्गेट अशा विविध आरोपांनी सत्तार अडचणीत आले. तसेच त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी सभागृहात मोठा गदारोळ केला होता. शेवटी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोंडीत सापडलेल्या सत्तारांची सुटका देखील केली. मात्र, पुन्हा सत्तारांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. आता कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) संपत्तीच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सत्तार यांच्याविरोधातील तक्रारीत खळबळजनक आरोप
सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली म्हणाले, आम्ही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार जवळपास दीड हजार पानांची आहे. या तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. तसेच यात सत्तार यांनी जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे. या तक्रारीत जमीन बळकाविल्यासंबंधी 200 पुरावे सादर केले असल्याचा दावा देखील तक्रारकर्ते शंकरपेल्ली यांनी केला आहे.
''माझ्याविरोधात कटकारस्थानं करणारी लोक माझ्याच पक्षातील..''
माझ्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहेत. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण विरोधकांनी माझ्यावर आरोप केले. मात्र त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळलं आहे. त्यांच्या चौकशा झाल्या तर पळता भुई थोडी होईल असं म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला.
हे सर्व मला बदनाम करण्याच्या पार्श्वभूमीवर केले जाते. मग यामध्ये काही माझ्या पक्षातील लोकं देखील असू शकतात. तसेच यामध्ये काही माझे हितचिंतकही आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरू आहे असा आरोपही सत्तार यांनी यावेळी केला.
काय आहेत प्रकरण?
नागपूर खंडपीठाने वाशिमच्या ३७ एकर गायरान जमीन वाटपाच्या मुद्यावरून ताशेरे ओढले, सिल्लोडच्या कृषी महोत्सवासाठी १५ कोटींची वसुली सुरू असल्याचे आरोप झाले.विरोधी अजित पवारांनी तर विधानसभेत गायरान जमीन वाटप प्रकरणात दलाली झाल्याचा आरोप करत नियम कसे पायदळी तुडवले गेले? हे कागदोपत्री पुराव्यासह सभागृहात मांडले. गंभीर आरोप असल्याने चौकशी होईपर्यंत तरी सत्तारांचा राजीनामा घ्या अशी मागणी त्यांच्यासह विरोधकांनी केली आहे.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तारांच्या पाठीशी चट्टान बनून उभे राहिल्याने त्यांचं मंत्रीपद वाचलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात खांद्याला खांदा लावून भक्कमपणे उभं राहिल्यामुळे सत्तारांना अभय मिळाले. तर दुसरीकडे फडणवीसांची इच्छा नसताना देखील त्यांना सरकार बॅकफुटवर गेले असं चित्र निर्माण होवू नये यासाठी सत्तारांची पाठराखण करावी लागली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.