Gulabrao Patil Jalgaon News :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil Jalgaon News : वडेट्टीवारांचा 'तो' दावा गुलाबराव पाटलांनी फेटाळला ; म्हणाले...

Jalgaon News: राज्यात कमी पडलेल्या पाऊसामुळे पिण्याच्या पाण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News : मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे कारण देत त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाईल, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू झाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. हा दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट फेटाळून लावला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत केलेल्या दाव्यावरही भाष्य करत वडेट्टीवार यांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. असं म्हटलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, आजच माझं खासदार श्रीकांत शिंदेंशी बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या आजारपणाचं कारण काढून त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असं म्हणणं ही दुर्दैवी बाब, असल्याचा टोला राज्याचे गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

जळगाव येथे स्वतंत्रदिनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "राज्यात पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण भरलेली नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कपात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राज्यात कमी पडलेल्या पाऊसामुळे पिण्याच्या पाण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे. शेतीसाठी पाऊस पडला असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र तेवढ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. अजूनही धरणे पूर्ण भरलेली नाहीत. त्यामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. जो पर्यंत चांगला पाऊस पडून धरणे भरत नाही तोपर्यंत पिण्याच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णही घेण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी दररोज पाणी पुरवठा करण्यात येतो त्या ठिकाणी एक दिवसाआड तर ज्या ठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या ठिकाणी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. जनतेनेही शासनाला सहकार्य करावे असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT